प्रतीकात्मक फोटो - Canva
लंडन, 05 जुलै : प्रेम कधी, कुठे, कसं कुणावर होईल सांगू शकत नाही. अशीच एक नर्स आणि ती ज्या रुग्णालयात काम करत होती तिथं येणारा रुग्ण दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडलं. हळूहळू त्यांच्यातील जवळीक वाढली आणि त्यांनी शारीरिक संंबध ठेवले. पण नर्ससोबत शारीरिक संबंध ठेवणं रुग्णाच्या जीवावर बेतलं. नर्ससोबत रोमान्स करताना असं काही घडलं ही रुग्णाचा मृत्यू झाला. यूकेतील हे प्रकरण. पेनेलोप विलियम्स नावाची महिला 2019 सालापासून एनएचएसमध्ये नर्स म्हणून काम करत होती. इथं असलेल्या एका रुग्णासोबत ती रिलेशनमध्ये आली. नर्स आणि पेशंट दोघंही संमतीने दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. ते दोघंही एकमेकांना गुपचूप, कॉल, मेसेज करायचे. सोशल मीडियावर चॅटिंग व्हायची. रुग्णालयाबाहेर ते दोघं एकमेकांना भेटायचे.
एक दिवस दोघंही असंच रुग्णालयाबाहेर भेटले. एका कारमध्ये ते खूपच जवळ आली. शारीरिक संबंध ठेवताना रुग्णाला हार्ट अटॅक आला. आपली पोलखोल होईल म्हणून भीतीने पेनेलोपने अॅम्ब्युलन्सला कॉल केला नाही. तिने आपल्या एका सहकाऱ्याला फोन केला आणि सीपीआर द्यायला बोलावलं. पण तो तिथं येईपर्यंत खूप उशीर झाला होता. ज्यामुळे तिथंच त्याचा जीव गेला. 35वं वरीस धोक्याचं! वयाची पस्तीशी गाठताच नरक होतं आयुष्य; कारण आहे एक ‘शाप’ अखेर रुग्णालय प्रशासनापर्यंत ही बातमी पोहोचली आणि एकच खळबळ उडाली. पेनेलोपवर गुन्हा दाखल करून तिला नोकरीवरून काढण्यात आलं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चौकशीत पेनेलोपने सांगितलं, हा रुग्ण डायलिसिसाठी यायचा. त्या दिवशी त्याने तिला मेसेज करून बाहेर भेटायला बोलावलं. त्याच्या छातीत वेदना होत आहेत, असं तो म्हणाला. पण पेनेलोपने चौकशीत जे सांगितलं ते खोटं निघालं. खरंतर तिनेच त्याला फोन करून बोलावलं होतं. याचदरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. तेव्हा हार्ट अटॅक येऊन रुग्णाचा मृत्यू झाला. प्रियकरासाठी लिंग बदलून राहुल बनला रागिनी; मंदिरात केलं लग्न, पण नंतर भयानक घडलं डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, रुग्णालयामार्फत एक तपास समिती तयार करण्यात आली आह. या समितीच्या सदस्याने सांगितलं की पेनेलोपने लैंगिक संबंधास नकार दिला होता. पेशंट अचानक अस्वस्थ झाला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याचं ती म्हणाली.