मेरठ 06 मार्च : मेरठमध्ये लोकांना अतिशय आगळंवेगळं दृश्य पाहायला मिळालं. ट्रेनमध्ये बसून शेकडो लोक सहारनपूरहून दिल्लीला जात होते, मात्र ट्रेन रस्त्यातच खराब झाली. यादरम्यान ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या शेकडो लोकांनी धक्का देऊन ट्रेनला पुढे सरकवलं. हा घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे (Passengers Push Train Away From Burning Engine). चाऱ्यासह जिराफाने मुलालाही जबड्यात पकडून वरती ओढलं अन्…; थरकाप उडवणारा VIDEO शनिवारी सकाळी सहारनपूर येथून एक पॅसेन्जर ट्रेन दिल्लीला निघाली होती. दौराला स्टेशनवर पोहोचताच ट्रेनच्या एका डब्याला आग लागली (Fire Breaks Out in Passenger Train). यामुळे लोक घाबरले आणि ट्रेन स्टेशनवर थांबवण्यात आली. यानंतर ट्रेनमधील लोक लगेचच खाली उतरले. रेल्वेने या घटनेची माहिती फायर डिपार्टमेंटला दिली.
याचदरम्यान एका डब्याला लागलेली आग ट्रेनच्या इतर भागात पसरू नये, यासाठी प्रय़त्न केले गेले. दोन डब्यांना जोडणारी कपलिंग खोलता न आल्याने ती तोडली गेली. तोपर्यंत आग पसरून तिसऱ्या डब्यापर्यंत पोहोचली होती. यानंतर रेल्वेच्या स्टाफने ट्रेनच्या बाकीच्या भागाला आगीपासून वाचवण्यासाठी प्रवाशांची मदत घेतली. यानंतर एकत्र येत प्रवाशांनी आग लागलेले डबे उर्वरित ट्रेनपासून वेगळे केले. छत्तीसगडचे परिवहन आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस दीपांशु काबरा यांनी लोक या ट्रेनला धक्का देत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटलं, ‘आम्ही एकजुटीने पर्वत हलवू शकतो, ती तर ट्रेन होती. मेरठमध्ये जेव्हा ट्रेनला आग लागली तेव्हा प्रवाशांनी एकत्र येत ट्रेनला जळत्या बोगीपासून वेगळं केलं. त्यांच्या मदतीच्या भावनेचे आणि एकत्रित प्रयत्नांचे कौतुक करावे तितके कमी आहे!’
काही वेळाने अग्निशमन दलाने पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. रेल्वेला धक्का देण्याची ही घटना दिवसभर सोशल मीडियावर शेअर होत राहिली. लोक या व्हिडिओवर कमेंट करण्याबरोबरच प्रवाशांच्या एकजुटीचं कौतुक करत आहेत.