JOIN US
मराठी बातम्या / Viral / Video: भारत फिरण्यासाठी आलेला पाकिस्तानी यूट्यूबर; निर्जन ठिकाणी संपलं बाईकचं पेट्रोल, अन् मग...

Video: भारत फिरण्यासाठी आलेला पाकिस्तानी यूट्यूबर; निर्जन ठिकाणी संपलं बाईकचं पेट्रोल, अन् मग...

भारतातील पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मुंबई, केरळ या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देत सुमारे 8000 किलोमीटरचं अंतर कापलं. यादरम्यान त्याला अनेक अनुभवांना सामोरे जावं लागलं.

जाहिरात

पाकिस्तानी YouTuber मोटरसायकलिस्ट अबरार हसन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 18 जून : पाकिस्तानी YouTuber मोटरसायकलिस्ट अबरार हसन एका महिन्याच्या भारत दौऱ्यावर होता. त्यानी भारतातील पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मुंबई, केरळ या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देत सुमारे 8000 किलोमीटरचं अंतर कापलं. यादरम्यान त्याला अनेक अनुभवांना सामोरे जावं लागलं. हे अनुभव त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केले आहेत. त्यानी आपल्या खास अनुभवात आग्रा ते दिल्ली महामार्गाचा उल्लेख केला आहे. त्याने सांगितलं की, आग्राहून दिल्लीला येत असताना एका निर्जन ठिकाणी त्याच्या बाईकचं पेट्रोल संपलं. वाटेत तो मदतीची वाट पाहत होता. तेव्हा एका वृद्धाने सांगितलं की, हायवेपासून हाकेच्या अंतरावर एक पेट्रोल पंप आहे. अशा स्थितीत विनय नावाच्या व्यक्तीने त्याला दुचाकीवर बसवून पेट्रोल पंपावर नेलं. जिथे त्याने बाटलीत पेट्रोल घेतलं आणि नंतर गाडीत टाकून पुढे निघून गेला. AC मेकॅनिक झाला Youtube स्टार, पठ्याकडे आहे धूमची Hayabusa आणि Thar अबरार म्हणाले, “पेट्रोल पंपावर जाण्यासाठी रिक्षा मिळणं शक्य नव्हतं. तेव्हाच विनय भाई भेटले. ते आपल्या मुलाला सोडायला आले होते. त्यांनी मला त्याच्या बाईकवर बसवलं आणि इच्छित स्थळी नेलं.’’ प्रवासाला निघण्यापूर्वी अबरारने विनयचे पुन:पुन्हा आभार मानले. विनयनेही याला आपले कर्तव्य म्हटले आणि अबरारला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर तिथे जमाव जमला आणि त्यांनी अबरारशी चर्चा केली.

भारत दौऱ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ अबरारने आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत. यावेळी त्यानी भारतातील लोकांच्या आदरातिथ्याचे कौतुक केले. विशेषत: या काळात लोक त्याच्याशी ज्या पद्धतीने वागले, त्यामुळे तो भारतीयांचा फॅन झाला. त्याचा व्हिडिओ त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. प्रेम दिल्याबद्दल त्यानी भारतीय नागरिकांचे आभार मानले. अबरारचे त्याच्या YouTube चॅनेलवर 1.5 दशलक्षाहून अधिक सब्सक्राइबर आहेत, तर त्याच्या Instagram आयडी wildlensbyabrar चे 267K फॉलोअर्स आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या