हत्तीच्या कळपाला त्रास देताना तरुणांचा Video
नवी दिल्ली, 18 जुलै : जगात असेही लोक आहेत ज्यांना इतरांना त्रास द्यायला आवडतो. काहीही कारण नसेल तरी ते दुसऱ्यांना त्रास देऊन आनंद घेतात. मग ते माणूस असो किंवा प्राणी. अशा घटनांचे अनेक फोटो, व्हिडीओदेखील समोर आले आहेत. अशातच यामध्ये आणखी एका घटनेची भर पडली असून काही तरुण हत्त्तीच्या कळपाला त्रास देताना दिसले. या व्हिडीओ समोर आला आहे. जंगल सफारीसाठी आलेल्या काही तरुणांनी हत्तीच्या कळपाला उगाच त्रास दिल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हे त्यांच्या अंगलटही आलं असतं मात्र प्राण्यांनी तेथून पळ काढल्यामुळे तरुण वाचले.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जंगलात काही तरुण रस्त्याने चालले आहेत. तेवढ्यात मागून हत्तीचा कळप येतो. हत्तीसोबत त्याची बाळं दिसत आहेत. त्यांना पाहून या तरुणांनी ओरडायला सुरुवात केली. घाबरुन कळप तेथून वेगानं निघून गेला. तरुणांच्या या कृतीवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. @susantananda3 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 16 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असून अनेक कमेंट येत आहेत. अनेकांनी तरुणांच्या या कृतीवर संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, जंगल सफारीचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. कधी पर्यटक प्राण्यांना त्रास देतात तर कधी प्राणी पर्यटकांवर हल्ला करतात. यापूर्वीही असे व्हिडीओ समोर आले आहेत.