JOIN US
मराठी बातम्या / Viral / कोणत्या मॅजिकपेक्षा कमी नाही हा VIDEO; आजोबांची ड्रम वाजवण्याची स्टाइल 'लय भारी'

कोणत्या मॅजिकपेक्षा कमी नाही हा VIDEO; आजोबांची ड्रम वाजवण्याची स्टाइल 'लय भारी'

आजोबांची ड्रम वाजवण्याची युनिक स्टाइल पाहून तुम्ही त्यांचे फॅन व्हाल.

जाहिरात

ड्रम वाजवण्याची हटके स्टाईल (फोटो सौजन्य - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 ऑगस्ट : प्रत्येकाकडे काही काही ना कला असते आणि काही जणांकडे ती कला सादर (Talent) करण्याचं कौशल्य असतं. नाचणं, गाणं, वाजवणं किती तरी जणांना आवडतं. पण त्यातही वेगळं टॅलेंट (Talent video) दाखवता येत. सध्या अशाच एका टॅलेंटेड आजोबांचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे (Old man playing drum). जो पाहून तुम्ही थक्कच व्हाल. ड्रम (Drum playing) वाजवणारे आजोबा सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. ज्यांची ड्रम (Drum video) वाजवण्याची स्टाइल एकदम हटके आहे. अगदी युनिक पद्धतीने ते ड्रम वाजवताना दिसत आहेत. त्यांची ड्रम वाजवण्याची अनोखी शैली पाहली तर तुम्ही त्यांच्यावर फिदाच व्हाल.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता, एका दुकानाच्या बाहेर रस्त्यावर एक वयस्कर व्यक्ती. त्याच्यासमोर काही वाद्यं आहेत. सामान्यपणे कोणतंही वाद्य वाजवताना वाजवणारी व्यक्ती त्या वाद्याच्या जवळ असते. पण ही व्यक्ती मात्र आपल्या वाद्यापासून बरीच दूर आहे. हे वाचा -  VIDEO - फक्त डोळे बंद करून ऐका या चिमुकल्याचा आवाज; टॅलेंट पाहून थक्क व्हाल ही व्यक्ती ड्रम वाजवते आहे, पण ड्रमपासून ते काही अंतर दूर आहेत. त्यांच्या हातात दोन काठ्या आहेत. पण ड्रमसाठी ते आपल्या हातातल्या काठ्या वापरत नाही आहेत. तर या काठ्यांनी दुसऱ्या आणखी दोन काठ्या हवेत उडवत त्या ड्रमच्या दिशेने फेकत ते ड्रम वाजवत आहेत. जणू त्यांच्या ड्रममध्ये किंवा या काठ्यांमध्ये चुंबकच असावा अशा या काठ्या सहजपणे उडत ड्रमवर बसत आहेत. हे वाचा -  खतरनाक बाइक स्टंट करताना तरुणाचा तोल गेला आणि…; पाहा थरारक VIDEO व्हिडीओ पाहिला तर हा एखादा मॅझिक शोच आहे असंच वाटतं. कोणत्या मॅजिक व्हिडीओपेक्षा हा व्हिडीओ कमी नाही आहे. @fred035schultz ट्विटर युझरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो पाहून प्रत्येक जण थक्क झाला आहे आणि त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. या आजोबांच्या टॅलेंटला सर्वांनी दाद दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या