JOIN US
मराठी बातम्या / Viral / Shocking! पुण्याच्या रस्त्यावर उभ्या उभ्या खाक झाली E-Scooter; पेटत्या स्कूटरचा VIDEO VIRAL

Shocking! पुण्याच्या रस्त्यावर उभ्या उभ्या खाक झाली E-Scooter; पेटत्या स्कूटरचा VIDEO VIRAL

पार्क केलेल्या ई-स्कूटरने अचानक पेट घेतला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 26 मार्च : पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे इलेक्टिक स्कूटर वापरणाऱ्यांकडे लोकांचा कल आहे. अशाच एका ई-स्कूटरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहूनच धडकी भरेल. पेट्रोलच्या वाढत्या किमतीत आता दिलासा देणाऱ्या ई-स्कूटरनेही (E-Scooter fire) धसका दिला आहे. ई-स्कूटरने अचानक पेट घेतला आहे. पार्किंगमध्ये उभ्या उभ्या ई-स्कूटर खाक झाली आहे (Electric Scooter fire). भारतात सर्वात पॉप्युलर आहे ती ओला इलेक्ट्रिक स्कूटर (Ola Electric Scooter). या व्हिडीओतही ओला एस1 प्रो (Ola S1 pro) स्कूटर दिसते आहे. या स्कूटरमधून धूरच धूर निघतो आहे. त्यानंतर काही क्षणातच अचानक ही स्कूटर पेटते. स्कूटरला आग लागते. संपूर्ण स्कूटर आगीच्या विळख्यात सापडते. पाहता पाहता स्कूटर खाक होते. @nileshj100 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो पुण्याच्या लोहगावमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. रहदारीच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला ही स्कूटर पार्क करण्यात आली आली आहे. यामध्ये आग कशी लागली, याचं नेमकं कारण समजलेलं नाही. पण तांत्रिक बिघाडामुळे असं झालं असं सांगितलं जातं आहे. हे वाचा -  नदीवरील पुलाच्या कठड्यावर स्टंट मारताच तोल गेला आणि…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO स्कूटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथिअम आयन बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली, असा दावा सोशल मीडियावर केला जातो आहे. लिथिअम आयन बॅटरीमध्ये लागलेली आग विझवणं कठीण असतं. पाण्याच्या संपर्कात येतात हायड्रोजन गॅस आणि लिथिअम हाइड्रॉक्साइडची निर्मिती करतं. यामुळे हे अधिकच ज्वलनशील हायड्रोजन गॅसममध्ये रूपांतरित होतं. ओला S1 मध्ये  2.97 kWh तर S1 प्रो  मध्ये 3.98kWh  बॅटरी असते.

संबंधित बातम्या

कारण काहीही असो पण अशा पद्धतीने ई-स्कूटरला आग लागणं शॉकिंग आहे. अशी स्कूटर खरेदी केलेले किंवा खरेदी करण्याच्या विचारात असलेले लोक घाबरले आहेत. हे वाचा -  बाईक काही स्टार्ट झाली नाही पण…; ‘पापा की परी’च्या जबरदस्त कीकचा VIDEO VIRAL ओला इलेक्ट्रिकने जुलै 2021 साली आपल्या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या होत्या. त्यावेळी कंपनीला फक्त 24 तासांत एक लाख ऑर्डर मिळाल्या होत्या. त्यानंतर कंपनीने डिसेंबर 2021 पासून काही मोजक्य शहरात या स्कूटरची डिलीव्हरी सुरू केली. सुरुवातीच्या 100 स्कूटर बंगळुरू आणि चेन्नईतील ग्राहकांसाठी डिलीव्हर केल्या होत्या. (व्हिडीओ आणि त्याबाबत केल्या जाणाऱ्या दाव्यांबाबत न्यूज 18 पुष्टी करत नाही)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या