JOIN US
मराठी बातम्या / Viral / 4 वर्षांपूर्वी दफन केलेला ननचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढला अन्...; आजवर कधीच घडलं नाही ते घडलं

4 वर्षांपूर्वी दफन केलेला ननचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढला अन्...; आजवर कधीच घडलं नाही ते घडलं

4 वर्षांपूर्वी दफन केलेला ननचा मृतदेह पुन्हा जमिनीतून बाहेर काढल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

जाहिरात

ननचा मृतदेह पाहून सर्वांना धक्का.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जेफरसन सिटी, 27 मे :  जगात आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. मृत्यूनंतर मृतदेह जाळला जातो किंवा पुरला जातो. मृतदेह पुरल्यानंतर तो पुन्हा मातीत मिसळतो. जळल्यावर शरीर हवेतील अनेक घटकांमध्ये मिसळते. याचा अर्थ मृत्यूनंतर मानवी शरीर पुन्हा निसर्गातच जातं. असं असताना एक अशी घटना चर्चेत आली आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. 4 वर्षांपूर्वी दफन केलेला ननचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढला अन् आजवर कधीच घडलं नाही ते घडलं. यूएसच्या मिसुरीमधील गोवर या छोट्याशा गावात एक विचित्र घटना घडली. याठिकाणी चार वर्षांपूर्वी एका ननचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आला. पण चार वर्षांनंतर तो मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आला. त्यावेळी सर्वांना जे दिसलं ते खूपच शॉकिंग होतं. मृतदेह पाहून सर्वच हादरले.  कारण 4 वर्षांपूर्वी पुरण्यात आलेला ननचा मृतदेह जसाच्या तसा होता.

साधारणपणे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृतदेह पुरला नाही किंवा जाळला गेला नाही तर काही काळानंतर तो कुजण्यास सुरुवात होते. पण या ननचे त्याच अवस्थेत उत्खनन करण्यात आलं, ज्या अवस्थेत तिला पुरण्यात आलं होतं. …म्हणून किन्नरांची अंत्ययात्रा रात्रीच काढतात; मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहासोबत काय काय होतं माहितीये? पूर्वीच्या काळात काही लोकांचा असा विश्वास होता की काही लोक मृत्यूनंतर पुन्हा जिवंत होतात. त्यामुळे त्याचे शरीर टिकवण्यासाठी मृतदेहावर खास लेप लावला जायचा. पण या ननच्या मृतदेहावर तसा कोणताही लेप लावला नव्हता. तरी तिचा मृतदेह जराही कुजला नव्हता. शरीरावर कुजण्याची लक्षणंच नव्हती.  मृत सिस्टर विल्हेल्मिनाचे पाय चार वर्षांपूर्वी जसे होते तसे होते. सिस्टर विल्हेल्मिनाच्या चेहऱ्याच्या भुवया, नाक, मागचे केस, केस सर्व ठीक होते. त्याच्या चेहऱ्यावर हसू दिसत होतं. Weird Animal : कापलं तरी जिवंत राहतो, याला कधीच मरण नाही; जगातील एकमेव अमर जीव कोणत्याही लेपशिवाय शरीर चार वर्षांपूर्वी जसं होतं तसंच आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण लोक याला चमत्कार मानत आहेत. या चमत्कारानंतर सिस्टर विल्हेल्मिना यांचं पार्थिव दर्शनासाठी चर्चमध्ये ठेवण्यात आले. आता हा चमत्कार कसा घडला हे शोधण्यात तज्ज्ञ व्यस्त आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या