JOIN US
मराठी बातम्या / Viral / लाइफ हो तो ऐसी! जन्मानंतर 2 दिवसांतच चिमुकली बनली करोडपती; आलिशान हवेली, ट्रस्टची मालकीण

लाइफ हो तो ऐसी! जन्मानंतर 2 दिवसांतच चिमुकली बनली करोडपती; आलिशान हवेली, ट्रस्टची मालकीण

जन्मानंतर दोन दिवसांतच कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची मालकीण झालेली ही चिमुकली चर्चेत आली आहे.

जाहिरात

करोडपती चिमुकली (फोटो - इन्स्टाग्राम)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 29 जून : असं म्हणतात की काही जण तोंडात चांदीचा चमचा घेऊनच जन्माला येतात. अशीच एक चिमुकली सध्या चर्चेत आली आहे. जी जन्मानंतर अवघ्या दोन दिवसांतच करोडपती बनली आहे. आलिशान हवेली आणि एका ट्रस्टची मालकीण झाली आहे. जिथं लोक आपलं एखादं छोटंसं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कित्येक वर्षे धडपड करतात तिथं ही चिमुकली जगात पाय ठेवताच काहीच न करता करोडपती बनली, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. या चिमुकलीचा जन्म अमेरिकन बिझनेसमन बॅरी ड्रिविट-बार्लो यांच्या घरी झाला. 51 वर्षीय बॅरी आपल्या कुटुंबाला करोडोंच्या भेटवस्तू दिल्याने अनेकदा चर्चेत असतात.  बॅरी दरवर्षी ख्रिसमसला खूप खर्च करतात. गेल्या वर्षी त्यांनी 4 दशलक्ष पाऊंड खर्च केले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचा मुलगा रोमियोला 25 कोटींची बोटही दिली. त्यावेळीही त्याची खूप चर्चा झाली होती. आता त्यांच्या मुलीने मुलीला जन्म दिल्याने ते खूप आनंदी आहेत.

आपल्याला नात झाल्याची आनंदाची बातमी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. OMG! आईच्या पोटात बाळाने केलं असं कृत्य; VIRAL VIDEO पाहून सर्वजण थक्क इन्स्टाग्रामवर मुलीचा आणि नातीचा फोटो शेअर करत ते म्हणाले,  “आज माझी 23 वर्षांची मुलगी सॅफ्रॉन ड्रिविट-बार्लो हिने एका मुलीला जन्म दिला आहे आणि आम्ही खूप आनंदी आहोत. मी एक आलिशान वाडा खरेदी केला होता, ज्याचं इंटीरियर आता माझ्या नातीच्या आवडीनुसार केलं जाईल.  हा वाडा आता तिच्या मालकीचा आहे. आम्ही आलिशान हवेली आणि ट्रस्ट फंड आमच्या नातीच्या नावे केलं आहे. द सनच्या वृत्तानुसार, बॅरीने चिमुकल्या नातीच्या नावावर सुमारे 10 कोटी रुपयांची संपत्ती आणि सुमारे 52 कोटी रुपयांचा ट्रस्ट फंड केला आहे. आलिशान वाड्यात नोकर-चाकर आणि गाड्याही आहेत. डोळ्यांच्या उलट्या पापण्या, जन्मताच दात आले अन्…; बाळाला पाहताच डॉक्टरांनाही फुटला घाम गेल्या वर्षी अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी 2,06,000 अब्ज रुपयांचा वारसा त्यांचा मुलगा अलेक्झांडर सोरोस याच्या हाती देण्याची घोषणा केली होती. अॅलेक्सने आपल्या क्षमतेच्या जोरावर हे यश मिळवल्याचे त्याने म्हटलं होतं. अशा घटना अमेरिकेतच नाही तर भारतातही पाहायला मिळतात. गेल्या वर्षी यूपीमधील सहारनपूरमधून बातमी आली होती की भीक मागायला लावलेल्या मुलाला त्याचं वडिलोपार्जित घर आणि करोडो रुपयांची 5 बिघा जमीन त्याच्या आजोबांना देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या