पंढरपूर, 19 जुलै : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वयाच्या 81 व्या वर्षीय कुणालाही लाजवेल असा पद्धतीने काम करत आहे. पंढरपूरमध्ये आज शरद पवारांचे वेगळे रुप पाहण्यास मिळाले. आपल्या एका ‘87 वर्षांच्या’ तरुण कार्यकर्त्यासाठी पवारांनी गाडीचा ताफा थांबवला आणि विचारपूस केली. महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिलेच पण अनेक मुख्यमंत्री आणि सरकारही पाहिली. आता त्यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. राज्यात सध्या कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. पण, अशाही परिस्थितीत शरद पवार हे जिल्ह्यांचे दौरे करत आहे.
आज शरद पवार हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पंढरपूर तालुक्यातील बाजीरावची विहीर येथे शेळवे गावालगत शरद पवारांचा भरधाव जाणारा ताफा अचानक थांबला. धक्कादायक! कोरोना रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात शरद पवारांचा ताफा थांबवण्याचे कारणही तसेच होते. शेळवे गावात राहणारे 87 वर्षांचे पांडुरंग गाजरे हे शरद पवारांना खूप प्रेम करतात. ज्या ज्या वेळी शरद पवार हे पंढरपूरच्या दौऱ्यावर येतात तेव्हा आवर्जून गाजरे यांची भेट घेत असतात. त्यामुळे महामार्गावर राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांसह पांडुरंग गाजरे हे उभे होते. कार्यकर्ते राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन उभे होते. दूरुनच पवारांना याचा अंदाजा आला आणि त्यांनी ताफा थांबवण्यास सांगितले. यावेळी पवारांच्या गाडीत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे सुद्धा होते. मानलं पुणेकराला, कोरोनाबाधित आजींना पाठीवर बसून डोंगरावरून खाली आणलं शरद पवारांनी गाडीतूनच पांडुरंग गाजरे यांची आपुलकीने विचारपूस केली. तब्येची माहिती जाणून घेतली. पांडुरंग गाजरे यांनी एक निवदेनही दिलं, पवारांनी त्यांचं निवदेनही स्वीकारलं. त्यानंतर शरद पवारांचा आला तसा ताफा पुन्हा सुसाट वेगाने पुढच्या दिशेनं निघाला. शरद पवारांचा ताफा थांबलेला पाहून कार्यकर्तेही भारावून गेले होते.