नवरदेव नवरीला घेण्यासाठी थेट जेसीबी घेऊन पोहोचला
नवी दिल्ली, 17 जून : लग्नातील अनेक निरनिराळे व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालत असतात. यामध्ये अनेक हटके, मजेशीर, विचित्र, व्हिडीओ समोर येतात. अशातच यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली असून वधूच्या सासरी पाठवणीचा व्हिडीओ समोर आलाय. यावेळी वधूच्या पाठवणीच्या हटके अंदाज पहायला मिळतोय. जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. नववधूची निरनिराळ्या अंदाजात पाठवणी केली जाते. प्रत्येक वधूला आपली पाठवणी इतरांपेक्षा वेगळी असावी, सासरी एका हटके स्टाईलने जावं अशी इच्छा असते. मात्र सध्या समोर आलेल्या वधूचा अंदाज पाहून तुमच्याही भुवया उंचावतील.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नववधूची पाठवणी चक्क जेसीबीमध्ये केली जात आहे. वधू सासरी नेण्यासाठी जेसीबी आणण्यात आला असून समोर वधू वर आणि मुलगा बसलेला दिसत आहे. वधू वरांचा हटके स्वॅग कॅमेऱ्याद कैद करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
@Akshara117 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 1 मिनिट 13 सेकंदाच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहे. लोक अनेक मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. दरम्यान, नववधू वरांचा हा हटके व्हिडीओ झारखंडमधील रांची येथील आहे. लग्नातील वधू वरांचे असे हटके व्हिडीओ इंटरनेटवर नेहमीच फिरत असतात. यामध्ये त्यांचा हटके स्वॅग, विचित्र, मजेशीर गोष्टी पहायला मिळतात.