JOIN US
मराठी बातम्या / Viral / जगातील असं रहस्यमय ब्रिज, ज्यावर जाताच आत्महत्या करतात कुत्रे, वाचा संपूर्ण माहिती

जगातील असं रहस्यमय ब्रिज, ज्यावर जाताच आत्महत्या करतात कुत्रे, वाचा संपूर्ण माहिती

या पुलाशी निगडीत अनेक कथा आहेत. काही लोकांना हा पूल भूतांशी जोडलेला असल्याचे सांगितले आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 2 सप्टेंबर : आजच्या काळात लोक इतकं तणावपूर्ण आयुष्य जगत आहेत की, त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. अशातच अनेक लोक, मुख्यता तरुण पिढी नैराशात जगत आहे, ज्यामुळे ते आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतात. तसे पाहाता स्वत:चं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेणं देखील फारच कठीण असतं, परंतू समोर असलेल्या प्रॉबलब्स पुढे त्यांना आयुष्य संपवनं सोपं वाटतं. तरुणांनी असं आयुष्य संपवनं फारच चूकीचं आहे. परंतु येथे खरा मुद्दा हा वेगळाच आहे. एखादी व्यक्ती जेव्हा आत्महत्या करते, तेव्हा त्याचे कारण समजण्यासारखे असते, म्हणजे नैराश्य किंवा आणखी काही पर्सनल कारणं असू शकतं. पण प्राणी आत्महत्या करताय? हे ऐकायला वेगळं वाटत असलं तरी देखील एक अशी माहिती समोर आली आहे ती खरोखरंच आश्चर्यचकीत करणारी आहे. या जगात असा एक पूल आहे जिथे कुत्रे उडी मारून आत्महत्या करतात. चला या पुलाबद्दल आणि या कुत्र्यांच्या आत्महत्येमागील रहस्य काय आहे? ते जाणून घेऊ या. स्कॉटलंडमध्ये हा रहस्यमय पूल आहे जो कुत्र्यांच्या आत्महत्येसाठी ओळखला जातो. या पुलाला डॉग्स सुसाईड ब्रिज म्हणूनही ओळखलं जातं आणि या पुलाची उंची 50 फूट आहे. या पुलावर फिरायला आलेला कोणताही कुत्रा स्वतःहून पुलावरून उडी मारतो. आतापर्यंत शेकडो कुत्र्यांनी या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. हे वाचा : मध्यरात्री महिलेची छेड काढण्यासाठी यायचा ‘भूत’, अखेर कोर्टात समोर आलं या आत्म्याचं रहस्य! मीडिया रिपोर्टनुसार, या पुलाचे रहस्य काय आहे हे, आतापर्यंत कोणालाही कळू शकलेले नाही. आजपर्यंत हा पूल एक गूढच राहिला आहे की या पुलावर कुत्रा येऊन आत्महत्या का करतात? पुलावरून उडी मारलेल्या कुत्र्यांपैकी 50 कुत्र्यांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. कुत्र्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर पाहुण्यांना माहिती व्हावी यासाठी संबंधित नोटीसही लावण्यात आली आहे. हा पूल 1950 मध्ये बांधण्यात आला होता. पूल बांधल्यापासून अशा घटना घडत असल्याचे लोक सांगतात. या संबंधीत अनेक कथा प्रसिद्ध या पुलाशी निगडीत अनेक कथा आहेत. काही लोकांना हा पूल भूतांशी जोडलेला असल्याचे सांगितले आहे. पुलावरुन चढताच कुत्र्यांच्या आत भूत येते आणि ते पुलावरून उडी मारून आत्महत्या करतात असे अनेकांचे म्हणणे आहे. ज्यांचे कुत्रे इथे उडी मारून मरण पावले आहेत ते लोकही मानतात की इथे काहीतरी विचित्र आहे, ज्यामुळे अशा घटना घडतात. हे वाचा : त्यांच्या आयुष्यात पैसा स्वप्नासारखा आला, पण होतं नव्हतं ते सगळं घेऊन गेला; नक्की असं काय घडलं? त्याच वेळी, काही लोक म्हणतात की, लेडी ऑफ ओव्हरटनचा आत्मा ब्रिजवर राहतो, तिचा आत्मा तिच्या पतीच्या मृत्यूनंतर 30 वर्षे येथे एकटा राहत होता. ज्यामुळे तो हे कुत्र्यांकडून असं सगळं करुन घेतं. लोक काहीही बोलत असले तरी, इथे असं का घडतं याचं कोणतंही कारण समोर आलेलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या