15 वर्षीय मुलीकडे सापडली ई-सिगारेटची सुमारे 15 पाकिटं (प्रतिकात्मक फोटो)
नवी दिल्ली 08 जून : मुलांनी काही चांगलं काम करो किंवा वाईट, त्याच संपूर्ण श्रेय हे पालकांनाच जातं. मुलांनी वाईट काम केलं की पालकांनी काही संस्कार केले आहेत की नाहीत? असं अनेकदा कोणी ना कोणी म्हटलेलं तुम्ही ऐकलं असेल. त्यामुळे प्रत्येक पालकाला वाटत असतं की, त्यांच्या मुलांची वागणूक चांगली असावी. मात्र, स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे राहणाऱ्या एका महिलेच्या बाबतीत असं काही घडलं की जे ऐकल्यानंतर अनेक पालकांच्या पायाखालची जमीन सरकेल. ही महिला तिच्या 15 वर्षांच्या मुलीच्या बेडरुममध्ये गेल्यानंतर तिनं जे पाहिलं त्यानं तिला धक्काच बसला. स्वतःच्या मुलांनी शिकून मोठं व्हावं, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. वाईट सवयींपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी पालकांचा प्रयत्न असतो. पण मुलांच्या वाईट सवयीची माहिती मिळाल्यावर पालक हतबल होतात. अशीच एक घटना एका महिलेनं शेअर केली आहे. ही महिला जेव्हा तिच्या अल्पवयीन मुलीच्या बेडरुममध्ये गेली, तेव्हा तिला समोरचं दृश्य पाहून धक्काच बसला. या महिलेचं नाव लीन मॅकगायर आहे. Video Viral: आईला भेटण्यासाठी चिमुकल्याची जीवघेणी धडपड, केलं असं काही की पोलीसही शॉक डेली मेलच्या रिपोर्टनुसार, गेल्या आठवड्यात मॅकगायर या बीबीसीच्या ‘वुमन्स अवर’ या कार्यक्रमात दिसल्या. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘अलीकडेच जेव्हा मी माझ्या मुलीच्या बेडरुममध्ये गेले, तेव्हा मी सिगारेटचे वॅप्स पाहिले. बेडरुममध्ये मी आणखी शोध घेतला असता मला माझ्या मुलीनं लपवून ठेवलेली ई-सिगारेटची सुमारे 15 पाकिटं सापडली. ही पाकिटं आकारानं लहान असल्यानं ती लपवणंही सोपं होतं. या वेळी मी माझ्या मुलीशी बोलले असता ती म्हणाली, ‘मला याची सवय लागली असून, यामध्ये निकोटिन नाही.’ माझी मुलगी हे एक प्रकारचं व्यसन आहे, हे मानायला तयार नव्हती.’ मॅकगायर पुढे म्हणाल्या, ‘माझी 15 वर्षांची मुलगी ई-सिगारेटच्या व्यसनाला बळी पडली असल्याची मला खात्री पटली. त्यानंतर मी डॉक्टरांचा सल्ला घेतला असता, ते मुलीचं व्यसन कसं सोडवावं, याबद्दल कोणताही सल्ला देऊ शकले नाहीत. उलट त्यांनी सांगितलं की, ई-सिगारेटला कोणताही पर्याय नाही. त्यानंतर माझ्या मुलीचं ई-सिगारेटचे व्यसन सोडवण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला.’ दरम्यान, या प्रकारानंतर मॅकगायर यांनी व्यसनाचे तोटे मुलांना व पालकांना समजावे, यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेबाबत त्यांची प्रशासनासोबत सुद्धा चर्चा सुरू आहे. मात्र, यानिमित्ताने मुलांची काळजी घेण्यासाठी पालकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे, हे स्पष्ट होतं आहे.