JOIN US
मराठी बातम्या / Viral / छत कोसळत असल्याचं दिसताच बाळाला वाचवण्यासाठी आईची धाव; शेवट हृदय पिळवटणारा, VIDEO

छत कोसळत असल्याचं दिसताच बाळाला वाचवण्यासाठी आईची धाव; शेवट हृदय पिळवटणारा, VIDEO

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, घराचं छत कोसळणार असल्याची जाणीव होताच आई मुलाला उचलून घेत बाहेर पळते. आणखी दोन मुलं तिच्या मागे धावतात, परंतु एक लहान बाळ बेबी वॉकरमध्ये घरातच राहातं

जाहिरात

आईने बाळाला वाचवलं

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 27 जुलै : अपघात कधीच सांगून होत नाहीत. ते कधी, कसे आणि कोणासोबत होतील, हे कोणीच सांगू शकत नाही. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात ज्यामध्ये अचानक छत कोसळल्याने अनेक लोक आत गाडले गेल्याचं पाहायला मिळतं. असाच एक व्हिडिओ आजकाल पुन्हा पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये एक आई आपला जीव धोक्यात घालून आपल्या मुलाचा जीव वाचवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक भयानक घटना घडताना दिसते. जेव्हा घराचं छत कोसळतं तेव्हा एक आई आपल्या मुलासह घरात असते. यानंतरचं दृश्य खूपच भीतीदायक आहे.

संबंधित बातम्या

आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते, असं म्हणतात. याचाच प्रत्यय या व्हिडिओतही पाहायला मिळत आहे. आईने मोठं शौर्य दाखवत आपल्या मुलाला घराबाहेर काढलं. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना कंबोडियातील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, घराचं छत कोसळणार असल्याची जाणीव होताच आई मुलाला उचलून घेत बाहेर पळते. आणखी दोन मुलं तिच्या मागे धावतात, परंतु एक लहान बाळ बेबी वॉकरमध्ये घरातच राहातं. हे लक्षात येताच आई त्या बेबी वॉकरला घ्यायला परत जाते आणि आपल्या सोबत घेत बाहेर पळते. ती बेबी वॉकर घेऊन तिथून दूर जाताच धाडकन छत कोसळतं Viral video : सुसाट कारनं आधी बाईक नंतर विद्यार्थ्यांना उडवलं, पाहा थरारक VIDEO बेबी वॉकरमध्ये बसलेल्या आपल्या लहान मुलाला आई कशी बाहेर काढते हे व्हिडिओच्या दुसऱ्या फ्रेममधून स्पष्टपणे दिसत आहे. एक सेकंदही उशीर झाला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्स यावर निरनिराळ्या कमेंट करत आहेत. या व्हिडिओवर एका यूजरने लिहिलं की ‘मॉम इज गॉड’. इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या