JOIN US
मराठी बातम्या / Viral / पिल्लाला वाचवण्यासाठी पाण्यातच मगरीसोबत भिडली हत्तीण; VIDEO चा शेवट पाहून व्हाल शॉक

पिल्लाला वाचवण्यासाठी पाण्यातच मगरीसोबत भिडली हत्तीण; VIDEO चा शेवट पाहून व्हाल शॉक

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मोठा हत्ती आपल्या लहान पिल्लाला घेऊन तलावातील पाणी पित आहे. मात्र, तलावात एक महाकाय मगर आहे, जी भक्ष्याच्या शोधात आहे, हे हत्तीला माहिती नव्हतं

जाहिरात

हत्तीण आणि मगरीची लढाई

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 09 मे : माता धाडसी असतात आणि आपल्या मुलाला वाचवण्यासाठी कोणत्याही धोक्याचा सामना करू शकतात. वन्य प्राणी असोत किंवा सुसंस्कृत माणसं, सर्व माता आपल्या मुलावर कोणताही धोका असल्याचं समजताच संतप्त होतात. प्राण्यांचं वागणं अप्रत्याशित असलं तरी, जेव्हा त्यांच्या पिल्लावर कोणताही धोका येतो तेव्हा ते धोक्याचा सामना करण्यापूर्वी अजिताबही विचार करत नाहीत. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात एक मादा हत्ती आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी महाकाय मगरीसोबत भिडल्याचं पाहायला मिळतं. मगर आणि हत्तीच्या या भयानक लढाईचा व्हिडिओ समोर आला आहे. फक्त हिंमत पाहिजे! कुत्र्याने असं काही केलं की सिंहही घाबरुन पळाला, VIDEO पाहून नेटकरीही थक्क व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मोठा हत्ती आपल्या लहान पिल्लाला घेऊन तलावातील पाणी पित आहे. मादी हत्ती आपल्या सोंडेचा वापर करून आपल्या बाळाला आंघोळ घालण्याचा प्रयत्न करते. मात्र, तलावात एक महाकाय मगर आहे, जी भक्ष्याच्या शोधात आहे, हे हत्तीला माहिती नव्हतं. अचानक मगर पुढे सरकते आणि ती हत्तीवर उडी घेण्याचा प्रयत्न करते. मादी हत्तीणीला ते जाणवताच तिने लगेच मगरीवर हल्ला केला. संकटाची काळजी न करता मादी हत्ती मगरीवर आपला पाय ठेवते. तर भीतीने हत्तीचं पिल्लू आपल्या आईला बिलगूनच राहातं. मगरीवर हल्ला करताना हत्ती ओरडत राहतो. काही सेकंदांनंतर ती मोठी मगर तलावातून बाहेर येते आणि जीव वाचवण्यासाठी तिथून पळून जाते.

संबंधित बातम्या

भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडिओ 31 हजारहून अधिक वेळा युजर्सनी पाहिला आहे. या व्हिडिओने नेटिझन्सची मने जिंकली आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, “हत्ती आपल्या लहान पिल्लाचं रक्षण करण्यासाठी कोणत्या मर्यादेपर्यंत जाऊ शकतात, हे चक्रावून सोडणारं आहे. ही एक छोटीशी घटना आहे. मगरीला शरण जावं लागलं.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या