जगातील सर्वात महागडा फळ युबरी खरबूज
मुंबई, 07 जून : तुम्हाला जर महागड फळ आहे असं म्हटलं तर तुमच्या मनात त्या फळाची किंमत किती येईल? तुम्ही म्हणाल जास्तीत जास्त हजार किंवा मग 10 हजार. पण जर तुम्हाला असं फळ सांगितलं की ज्याची किंमत लाखात आहे मग? पहिलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही आणि बसलाच तरी देखील तुम्हाला त्या फळाबद्दल जाणून घेण्यासाठी नक्कीच उत्सूक्ता असेल. अनेकांचा मनात असा प्रश्न देखील उपस्थीत झाला असेल की नक्की असं या फळात आहे तरी काय? एवढ्या सोन्याच्या भावात तो का विकला जातोय? चला याबद्दल जाणून घेऊ. Viral News : तुम्हाला माहितीय का जगातील सर्वात गरीब देश? दारिद्र्य काय असतं यांना विचारा वास्तविक, जगातील सर्वात महाग फळाला युबरी खरबूज किंवा जपानचे युबरी खरबूज म्हणतात. या फळाची किंमत इतकी आहे की, आपल्या देशात चांगली आलिशान कार त्यात येऊ शकते. आश्चर्य म्हणजे महाग असूनही, याला खूप मागणी आहे, जपानचे श्रीमंत लोक ते मोठ्या आवडीने खातात. जगात अनेक प्रकारची फळे आणि भाज्या आहेत. यामध्ये मायक्रोन्युट्रिएंट्स आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. काही फळे आणि भाज्या त्यांच्या गुणवत्तेपेक्षा जास्त किंमतीमुळे चर्चेत राहतात. असेच एक फळ म्हणजे युबरी खरबूज. हे जगातील सर्वात महाग फळ मानले जाते. त्याची प्रति किलो किंमत 20 लाख रुपयांपर्यंत आहे. Cricket News : क्रिकेटच्या मैदानावर अनेक पिच का असतात? हे फळ फक्त जपानमध्ये घेतले जाते आणि ते प्रीमियम फळ मानले जाते. त्याची किंमत इतकी जास्त आहे की, ती स्थानिक बाजारपेठेत किंवा सुपरमार्केटमध्ये सहज उपलब्ध होत नाही. हे फळ कसे वाढते हे जपानमध्ये फार कमी प्रमाणात घेतले जाते आणि ते कोठेही निर्यात केले जाऊ शकत नाही. युबरी खरबूज हरितगृहात सूर्यप्रकाशाखाली उगवले जाते. हे खरबूज मूळचे युबरी शहरात घेतले होते, म्हणून त्याला युबरी खरबूज असे नाव पडले. तेथील हवामान या खरबूजासाठी योग्य आहे. हे खरबूज अतिशय नाजूक असतात. लागवडीपासून ते साठवणीपर्यंत खूप मेहनत घ्यावी लागते. फायदे काय आहेत Yubari melon च्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर निर्जलीकरण कमी करणे, प्रतिकारशक्ती वाढवणे, रक्तदाब कमी करणे, जळजळ कमी करणे आणि त्वचेसाठी चांगले असणे यासारखे अनेक फायदे आहेत. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स कॅन्सरचा धोका कमी करण्यासही मदत करतात असं म्हटलं जातं.