JOIN US
मराठी बातम्या / Viral / Video : अगं एक बाई जरा थांब, संयम ठेवलेल्या चिमुकल्याचे Expressions तुमचा दिवस बनवतील

Video : अगं एक बाई जरा थांब, संयम ठेवलेल्या चिमुकल्याचे Expressions तुमचा दिवस बनवतील

ती फक्त त्रास देत राहिली आणि तो सहन करत राहिला आणि… ‘या’ चिमुकल्यांचा व्हिडीओ पाहून उमटेल चेहऱ्यावर हसू

जाहिरात

क्यूट व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 फेब्रुवारी : सोशल मीडिया हे व्हिडीओचं भंडार आहे. येथे तुम्हाला असे व्हिडीओ पाहायला मिळतील जे तुमचं मनोरंजन करतील. तर येथील काही व्हिडीओ हे इतके क्यूट असतात की ते आपल्याला दिवसभराचा ताण आणि थकवा विसरायला भाग पाडतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो खरंच खूप सुंदर आहे. हा व्हिडीओ लहान मुलांशी संबंधीत आहे. लहान मुलं ही निरागस असतात आणि त्यांचं असं निरागस वागण अनेकदा खूपच क्यूट असतं. ही मुलं अनेकदा असं काही वागतात की, त्यांची कृती पाहातच राहावीशी वाटते. महाकाय अस्वल करतोय व्यायाम; क्युट Video होतोय व्हायरल लहान मुलांसंबंधीत अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील, पण हा व्हिडीओ काहीसा वेगळा आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की काही मुलं-मुली बसले आहेत. तेव्हा एक छोटी मुलगी तिच्या बाजूला बसलेल्या मुलाला त्रास देत आहे. ती खरंतर त्याचं लक्ष तिच्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो काही त्याचं लक्ष हटवायला तयार नाही. ही मुलगी देखील तिला जमेल तितकं या मुलाला त्रास देण्याचा प्रयत्न करते. तेव्हा हा मुलगा आधी तिला हाताने शांत राहण्याचा इशारा देतो. पण ती काही शांत राहात नाही. ही मुलगी हळूच त्या मुलाचे गाल ओढ, केस ओढ, त्याला हाताने मार असं करत असते, तेव्हा अखेर तो तिच्याकडे रागाने पाहातो आणि क्यूट असे एक्स्प्रेशन देतो. पण तरीही ती मुलगी गप्प राहाण्याचं नाव घेत नाही.

संबंधित बातम्या

हा चिमुकला भलेही रागाने तिच्याकडे पाहातोय, पण त्याचं हे वागणं आणि चेहऱ्यावरचे हावभाव हे खूपच क्यूट आहेत. पुढे ही मुलगी त्या मुलाला त्रास द्यायचं काही सोडत नाही, ती पुन्हा आपल्या हाताच्या कोपराने त्याला मारते, तो पुन्हा शांत बसलेला असतो. ही मुलगी त्या मुलाच्या तोंडापुढे जाते, त्याला किस देखील करते. पण तरी तो काही तिच्याकडे पाहात नाही. ही चिमुकली जेजे काही करते, ते सगळं काही तो मुलगा मुकाट्याने सहन करतो. या दोघांचं हे वागणं खूपच क्यूट आहे, जे नेटकऱ्यांना देखील आवडलं आहे.

हा व्हिडीओ कुठला आहे आणि कधी काढला गेला, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती कळू शकलेली नाही हा व्हिडीओ शेअर करताना त्यावर लिहिलंय, ‘‘जर संयम मुलगा असता तर…’’ हे टायटल या व्हिडीओसाठी बरोबर देखील आहे , कारण खरंच तो मुलगा जितक्या शांतपणे या मुलीच्या सगळ्या वागण्याकडे दुर्लक्ष करु लागतो, ते खरोखर कौतुकास्पद आहे. शिवाय त्याचा रागावलेला चेहरा तर इतका गोड आहे की तुम्हाला हा व्हिडीओ पाहून नक्कीच हसू येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या