नवी दिल्ली 03 एप्रिल : कोणतेही नियम आणि कायदा तोपर्यंतच चांगला वाटतो, जोपर्यंत आपल्याला त्याचा त्रास होत नाही. आयुष्य आपल्या मनाने जगण्याचं स्वतंत्र आणि आयुष्यात आनंदाचे क्षण असावे असं प्रत्येकाला वाटतं. मात्र एका महिलेच्या जीवनात हे काहीच राहिलं नव्हतं. मॉर्मन झाल्यानंतर ती धार्मिक बंधनात इतकी बांधली गेली होती की तिला आई आणि पत्नी म्हणून पूर्णपणे अपयशी झाल्यासारखं वाटू लागलं. यानंतर तिने असं पाऊल उचललं, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल.
धार्मिक बंधनात जखडून गेल्यावर लगेचच तिच्या आयुष्याची घुसमट होऊ लागली, तिचं वैवाहिक जीवनही नीरस बनलं. नंतर अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील मॉर्मन असलेल्या स्कायलरने सर्व बंधनं तोडली आणि OnlyFans वर अॅडल्ट मॉडेल (Mormon Became Adult Model) बनली. यानंतर ती आनंदी आहे की तिनं तिचं आयुष्य आणि लग्न दोन्ही वाचवलं. मात्र या निर्णयामुळे ती आपल्या माणसांपासून दूर गेली. परंतु याचा तिला पश्चाताप नाही.
स्कायलरने सोशल मीडियावर एक एक करून आपली पोहोच वाढवण्यास सुरुवात केली, त्यानंतर ती बाकीच्यांच्या नजरेत आली. सर्वप्रथम मॉर्मनच्या भूमिकेतून बाहेर पडल्यानंतर तिने इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले. ते पाहून तिच्या मुलीच्या मैत्रिणीत्या आईने तिला कॉल करून बरंच सुनावलं आणि त्या दोघींची मैत्री तोडली. स्कायलरने सांगितलं की ती पूर्वी जगत असलेल्या जीवनात इतकी बंधनं होती की ती तिच्या पतीसोबतही सुखी वैवाहिक जीवन जगू शकली नाही. त्या चर्चमध्ये सामील झाल्यानंतर तिथले कडक नियम पाळणं तिला नंतर अशक्य वाटू लागलं होतं.
जवळपास दहा वर्ष ती तिथल्या कडक नियमांचं पालन करत राहिली. या नियमांतून मोकळं होताच तिने तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर OnlyFans साइटवर अकाऊंट सुरू केलं. स्कायलर तिच्या नवीन जगात आनंदी आणि समाधानी आहे. तिचं वैवाहिक आयुष्यही आता सुरळित झालं आहे. मात्र तिच्या मुलीच्या मैत्रिणींच्या पालकांनी तिला याबद्दल बरंच सुनावलं असून तिच्या मुलीसोबतची मैत्री तोडायला सांगितलं आहे. मात्र स्कायलरचं म्हणणं आहे की हळूहळू सगळं ठीक होईल. सध्या एक दशकानंतर ती आपलं आयुष्य एन्जॉय करत आहे आणि तिचा पतीही यात तिला सपोर्ट करत आहे.