पाटणा, 02 एप्रिल : रस्त्यावर एका मुलीकडून मोबाईल नंबर मागणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तरुणीने मोबाईल नंबर मागणाऱ्या या रोडरोमियोला आपल्या चपलेचा नंबर दाखवला आहे. तिने भररस्त्यात या रोडरोमिओची चपलेने धुलाई केली आहे. बिहारच्या छपरामधील ही घटना आहे (Boy asking mobile number girl beaten up with chappal). लहलादपूरच्या जनता बाजारातील ही घटना आहे. हा मुलगा वारंवार तरुणीला त्रास द्यायचा, तिचा पाठलाग करायला, अश्लील कमेंट करायचा असा आरोप तिने केला आहे. एक दिवस त्याने तिचा मोबाईल नंबर मागितला आणि मग तरुणीचा ताबा सुटला. तिने काही तरुणांसोबत मिळून त्याची धुलाई केली. चपलेने त्याला धू धू धुतलं.
मोबाइल नंबर की जगह मिला चप्पल का नंबर... वीडियो छपरा के जनता बाजार का है... आरोप है कि युवक रोज परेशान करता था. वीडियो वायरल है...छपरा से आशुतोष की रिपोर्ट pic.twitter.com/DHYkJ8pcYR
— Prakash Kumar (@kumarprakash4u) April 2, 2022
व्हिडीओत पाहा तर ही मुलगी शालेय गणवेशात दिसते आहे. ती शाळेतील विद्यार्थीनी आहे. तिला त्रास देणारा तरुण सिकिटिया गावातील असल्याचं सांगितलं आहे. हे वाचा - गाणं ऐकताच Lady IAS Officer झाली सैराट, कॉलेज विद्यार्थ्यांसोबत घातला जबरदस्त धिंगाणा; पाहा VIDEO स्थानिक लोकांच्या माहितीनुसार जनता बाजारात बऱ्याच शैक्षणिक संस्थान आहेत. तिथं शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. असे तरुण रस्त्यावर छेडछाड, अश्लील कमेंट करत असतात. या विद्यार्थीनेने हिंमत करून एका तरुणाला चांगलीच अद्दल घडवली. याआधी उत्तर प्रदेशच्या रायबरेलीतही एका तरुणीचा अशीच तरुणाची भररस्त्यात चपलेने धुलाई केली होती. तरुणाने आपला पाठलाग केला. तो छेड काढत होता. त्यानंतर तिचा मोबाईल नंबरही मागितला. असा आरोप या तरुणीने केला होता.
मोबाईल नंबर मागताच तरुणीने थेट आपल्या पायातली चप्पल काढली आणि तरुणाला भरस्त्यात चोपायला सुरुवात केली. तरुणीला असं तरुणाला मारताना पाहून इतर लोक तिथं आले. त्यांनी त्या दोघांनाही समाजवलं. त्यानंतर तरुणीने त्याला मारणं थांबवलं. तरुणीने चपलेने धुलाई करणं थांबवाच पुन्हा असं काही केलं तर पोलिसात तक्रार करेन अशी धमकीही तिने त्याला दिली. हे वाचा - एकट्या सिंहिणीवर तुटून पडला तरसांचा कळप; शेवटी त्यांच्यासोबत जे घडलं ते भयावह; VIDEO VIRAL प्रिन्स रजनीश या युट्युबरने आपल्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तरुणीने जे धाडस दाखवलं त्यासाठी तिच्या हिमतीला दाद दिली जाते आहे. तिचं कौतुक केलं जातं आहे.