JOIN US
मराठी बातम्या / Viral / खेळण्यातल्या माकडाच्या पिलाला मेलेलं समजून वानरांनी वाहिली श्रद्धांजली, पाहा Video

खेळण्यातल्या माकडाच्या पिलाला मेलेलं समजून वानरांनी वाहिली श्रद्धांजली, पाहा Video

सोशल मीडियावर अनेक निरनिराळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. खास करुन प्राण्यांच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांची विशेष पसंती असते.

जाहिरात

व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 एप्रिल : सोशल मीडियावर अनेक निरनिराळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. खास करुन प्राण्यांच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांची विशेष पसंती असते. वन्य प्राणी आणि त्यांचं जीवन यांच्याविषयी अनेकांना कायमच आकर्षण असतं. त्यांचं राहणीमान, खाणं-पिणं वागणं या सर्वांविषयीच एक कुतुहल असतं. त्यामुळे असे व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होतात. अशातच सध्या वानरांचा एक श्रद्धांजली वाहतानाचा व्हिडीओ समोर आलाय. जो सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे.

सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, खोट्या माकडाच्या पिल्ल्लांसाठी वानर दुःख व्यक्त करत आहेत. वानराने पहिल्यांदा त्या माकडाच्या खोट्या बाळाला खरं समजून त्याला मिठी मारली. तिथे खूप वानर सेना त्या पिलाला श्रद्धांजली वाहण्यासाठी दुःख व्यक्त करण्यासाठी जमा झालीये. यातून त्यांच्या भावना आणि इतरांशी व्यवहार करण्याची पद्धत दिसून येतेय. खरं तर हा व्हिडीओ एका डॉक्यमेंट्रीमधील छोटासा शॉट आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

संबंधित बातम्या

प्राण्यांविषयी नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञ अनेक युक्त्या लढवत असतात. सध्या समोर आलेला व्हिडीओ बीबीसीच्या ‘स्पाई इन द वाइल्ड’ नावाच्या डॉक्यूमेंट्रींमधील असून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्राणी व्यवहार आणि भावनांच्या जाणून घेण्यासाठी हा रोहोटिक माकड ठेवण्यात आला होता. अशा प्रकारे वानर सहानुभूती दाखवतात हे यातून समोर आलं आहे. हेही वाचा -   पैसे वाचवण्यासाठी मॉडेलने केली स्वस्त सर्जरी, रातोरात झाली अशी भयाण अवस्था @AMAZlNGNATURE नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर भरपूर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या