JOIN US
मराठी बातम्या / Viral / ऑनलाईन Game खेळताना एकमेकांवर जडलं प्रेम; अल्पवयीन जोडप्यासोबत शेवटी मोठा 'गेम'

ऑनलाईन Game खेळताना एकमेकांवर जडलं प्रेम; अल्पवयीन जोडप्यासोबत शेवटी मोठा 'गेम'

मुलगी प्रेमात इतकी वेडी झाली, की ती पश्चिम बंगालमधून आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी गोड्डामध्ये पोहोचली. मुलगी घरच्यांना न सांगता निघून गेली

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रांची 06 मे : एक अतिशय अजब आणि अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे. यात एका अल्पवयीन मुलाचं मोबाईलवर फ्री फायर गेम खेळताना एका अल्पवयीन मुलीवर प्रेम जडलं. मुलगा झारखंडच्या गोड्डामधील तर मुलगी पश्चिम बंगालमधील होती. यानंतर दोघंही फोनवर भरपूर बोलू लागले. यादरम्यान मुलगी प्रेमात इतकी वेडी झाली, की ती पश्चिम बंगालमधून आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी गोड्डामध्ये पोहोचली. मुलगी घरच्यांना न सांगता निघून गेली, यानंतर घरातील लोकांनी तिचा शोध सुरू केला. इकडे आई-वडिलांच्या भीतीने मुलगा प्रेयसीला आपल्या घरी नेण्याऐवजी आजीकडे घेऊन गेला. आजी-आजोबांना सांगितलं, की मुलगी त्याची मैत्रीण आहे आणि त्याला भेटायला आली आहे. दुसरीकडे, मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या नंबरवर फोन केला असता, काहीच उत्तर मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी बंगालमधील संबंधित पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची एफआयआर दाखल केली. पोलीस तपासात तरुणीच्या मोबाईलचं लोकेशन गोड्डा येथे आढळून आलं.

यानंतर बंगाल पोलिसांनी गोड्डा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. गोड्डा उपायुक्त झीशान कमर आणि एसपी नथु सिंग मीना यांच्या सूचनेवरून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रितेश कुमार, गोड्डा ब्लॉकचे बीडीओ रोशन कुमार, मुफसिलचे स्टेशन हाऊस ऑफिसर गिरिजेश कुमार यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.त्यानंतर मुलाच्या वडिलांशी बोलून मुलीला पोलीस ठाण्यात आणून तिचं समुपदेशन करण्यात आलं मोबाईलवर गेम खेळताना गोड्डा येथील मुलाशी मैत्री झाल्याचं तिने चौकशीत सांगितलं. त्यानंतर दोघेही एकमेकांना पसंत करू लागले. मुलाला भेटण्यासाठी ती पश्चिम बंगालहून गोड्डा येथे आली. समुपदेशनानंतर ती घरी परतण्यास तयार झाली. त्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मुलीला पश्चिम बंगालमध्ये घरी पाठवण्यात आलं. हे प्रकरण एका अल्पवयीन मुलाशी संबंधित असल्याने जिल्हा प्रशासनाचे अधिकारी काहीही बोलण्यास नकार देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या