लॉकडाऊनला 1 लाखाची मागणी, परंतु मालकाला त्याला विकायचं नाही.
शिवम सिंह, प्रतिनिधी भागलपूर, 28 जून : आपल्या महाराष्ट्रात एकीकडे वारकरी विठ्ठल भेटीसाठी आतुर झाले आहेत, तर दुसरीकडे मुस्लिम बांधवांनी ईदसाठी बकरे तयार ठेवले आहेत. आषाढी एकादशी आणि ईद या दोन सणांचा संगम उद्या पाहायला मिळेल. तर, देशभरात ईदची जोरदार तयारी सुरू आहे. विविध बाजारांमध्ये लाखोंच्या दरात बकऱ्यांची विक्री होत आहे. या सगळ्यात बिहारचा ‘लॉकडाऊन’ बकरा तुफान चर्चेत आला आहे. छे छे! त्याचं नाव लॉकडाऊन आहे म्हणून तो प्रसिद्ध झाला असं नाहीये. तर, त्याचे नखरेच इतके आहेत की जे पुरवता पुरवता मालकाच्या अगदी नाकी नऊ आले आहेत. इतर बकऱ्यांसारखं साधं पाणी न पिणारा, थंड पाण्याचा हट्ट धरणारा, वेळेला कोल्डड्रिंक मागणारा हा तोतापूरी जातीचा बकरा ग्राहकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू बनला आहे.
आपण पाहिलं असेल तर, कोरोना लॉकडाऊन काळात जन्मलेल्या अनेक बाळांचं नामकरण कोरोना, सॅनिटायझर, व्हॅक्सिन, असं त्या परिस्थितीशी निगडित करण्यात आलं. भागलपूर जिल्ह्याच्या मौलानाचक भागातील रहिवासी शाहिद उर्फ भोला यांच्या या बकऱ्याचा जन्मही 2020च्या लॉकडाऊनमध्ये झाला म्हणून त्याचं नाव ‘लॉकडाऊन’ असं ठेवण्यात आलं. मागील वर्षी जिल्ह्याच्या ततारपूर चौकात भरलेल्या बकरा बाजारात शाहरुख आणि सलमान या बकऱ्यांना मोठी मागणी होती. तर आता लॉकडाऊनसाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. लग्नाच्या रात्री मिठाई आणायला गेला नवरा, परत आलाच नाही; नवरीच्या जीवाची घालमेल लॉकडाऊनला 1 लाखाची मागणी आली आहे. परंतु मालकाने त्याला विकायचं नाही, असं ठरवलंय. कारण मालकाला यंदाच्या ईदला स्वतःच्याच घरात त्याची कुर्बानी द्यायची आहे.