JOIN US
मराठी बातम्या / Viral / महापौरांनी मगरीशी केलं लग्न, किस घेताना Video व्हायरल

महापौरांनी मगरीशी केलं लग्न, किस घेताना Video व्हायरल

लग्न हे खूप पवित्र मानलं जातं. प्रत्येक ठिकाणी लग्नाविषयी वेगळे विधी, निराळ्या परंपरा आहेत. लग्नाविषयी अनेक विचित्र, हटके मजेशीर घटना सोशल मीडियावर समोर येत असतात.

जाहिरात

महापौरांनी मगरीशी केलं लग्न

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 02 जुलै : लग्न हे खूप पवित्र मानलं जातं. प्रत्येक ठिकाणी लग्नाविषयी वेगळे विधी, निराळ्या परंपरा आहेत. लग्नाविषयी अनेक विचित्र, हटके मजेशीर घटना सोशल मीडियावर समोर येत असतात. तुम्हाला विश्वासही बसणार नाही अशा गोष्टींसोबतही लोक लग्न करतात. आत्तापर्यंत तुम्ही स्वतःशीच लग्न केलं, टेडीसोबत लग्न केलं, अशा घटना ऐकल्या असतील मात्र कधी एका व्यक्तीने मगरीसोबत लग्न केलं ऐकलंय का? सध्या समोर आलेल्या घटनेत व्यक्तीने मगरीसोबत लग्न केलंय. ही बातमी सध्या वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होते. एका व्यक्तीने मगरीसोबत लग्न केल्याची घटना समोर आलीये. याचा एक व्हिडीओदेखील समोर आलाय जो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. दक्षिण मेक्सिकोतील एका छोट्या शहराच्या महापौराने मगरीसोबत लग्नगाठ बांधलीये.

एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, सभागृहात उपस्थित हजारो लोकांच्या उपस्थितीत महापौरांनी या मादी मगरीशी लग्न केलं. व्हिक्टर ह्यूगो सोसा, सॅन पेड्रो हुआमेलुला, मेक्सिकोच्या टेहुआनटेपेक इस्थमसमधील स्थानिक चोंटल लोकांच्या शहराचे महापौर, यांनी अॅलिसिया अॅड्रियाना नावाच्या मगरला पत्नी म्हणून स्वीकारले आणि पूर्वजांचा विधी पुन्हा केला.

संबंधित बातम्या

दरम्यान, गेल्या 230 वर्षांपासून येथे पुरुष आणि महिला कॅमनचे विवाह होत आहेत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही प्रथा सुरू झाली. सध्या सोशल मीडियावर याची चर्चा रंगली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या