JOIN US
मराठी बातम्या / Viral / Maths Puzzle: मॅथ्स पक्कं आहे? मग या प्रश्नाचं उत्तर देऊनच दाखवा; कित्येक लोक झाले फेल

Maths Puzzle: मॅथ्स पक्कं आहे? मग या प्रश्नाचं उत्तर देऊनच दाखवा; कित्येक लोक झाले फेल

Can You Solve This Maths Puzzle: सध्या असा गणिताचा प्रश्न इंटरनेटवर व्हायरल होतोय. त्याचं उत्तर देताना अनेक जन कन्फ्यूज होत आहेत. तुम्ही ते सोडवू शकता? एकदा ट्राय तर करुन पाहा…

जाहिरात

मॅथ्स पझल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 मे : कधी कधी आपण लहानपणी शिकलेले धडे मोठे झाल्यावर विसरतो. अशा वेळ अचानक एखादा प्रश्न आपल्यासमोर येतो तेव्हा तो प्रश्न कसा सोडवायचा हेच आपल्याला कळत नाही. असाच एक प्रकार इंटरनेटवर व्हायरल होतोय. खरंतर एक पोस्ट व्हायरल होतोय. यामध्ये एक छोटासा प्रश्न आहे, जो लोकांना खूप कन्फ्यूज करतोय. कारण सोपं गणित असुनही अनेकांना याचं उत्तर देता येत नाहीये. आत्तापर्यंत तुम्ही डोळ्यांना भ्रमित करणारी अनेक कोडी सोडवली असतील. पण आज तुम्हाला तुमच्या समोर असलेल्या कोड्यात तुमचा मेंदू पूर्णपणे वापरायचा आहे. पाहिल्यानंतर तुमचा थोडा गोंधळ उडेल, पण जर तुम्ही गणिताचे मूलभूत नियम लक्षात ठेवून हे प्रश्न सोडवले तर तुम्हाला लगेच उत्तर मिळेल.

सोपा प्रश्न पण डोक्याला ताप

व्हायरल पोस्टमध्ये दिलेला प्रश्न आहे – 2+5 (8-5). प्रश्न बघून तुम्हाला आठवत असेलच की तुम्ही अशा प्रॉब्लम्स छोट्या क्लासेजमध्ये सोडवायचा. पण, मोठे झाल्यानंतरही तुम्हाला हा नियम लक्षात आहे की नाही. याचीच टेस्ट आज आपण घेत आहोत. प्रश्नासोबतच त्याचे उत्तर असेही सांगण्यात आले आहे. जर तुमचे उत्तर 17 वर आले तरच तुम्ही योग्य मार्गावर आहात, अन्यथा तुम्ही गणितात कच्चे आहात.

Railway Facts: ट्रेन चालवायलाही ड्रायव्हिंग लायसन्स लागतं? लोको पायलट कसं बनता?

मिळालं का बरोबर उत्तर?

ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @PicturesFoIder नावाच्या अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना लोकांनी वेगवेगळी उत्तरे दिली आहेत. काही लोकांनी 21 असे उत्तर दिलंय. तर काहींनी ते सोडवण्यास टाळाटाळ केली. आधीच सांगितले आहे की उत्तर 17 आहे. हे उत्तरच बरोबर आहे. 2+5 (8-5)= 2+5(3)= 2+15= 17. हेही वाचा -  Maharashtra SSC Result 2023 Live updates: थोड्याच वेळात निकाल, न्यूज18 लोकमतवर सर्वात आधी पाहा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या