JOIN US
मराठी बातम्या / Viral / बापरे! तिखट मोमोज खाल्ल्यामुळे पोटात झाला स्फोट, रुग्णांची अवस्था पाहून डॉक्टरही हादरले

बापरे! तिखट मोमोज खाल्ल्यामुळे पोटात झाला स्फोट, रुग्णांची अवस्था पाहून डॉक्टरही हादरले

मिर्ची असलेले मोमोज खाल्ल्यानंतर रुग्णाच्या पोटाची अशी झाली अवस्था, फोटो पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीजिंग, 04 ऑगस्ट: मोमोज हा पदार्थ चीनमधून आला असला तरी भारतातही तेवढाच लोकप्रिय आहे. देशातील विविध राज्यांमध्ये इंडियन स्टाइल मोमोजही मिळतात. मात्र ही बातमी मोमोज कसे तयार करायचे याची नाही तर मोमोज खाल्ल्यामुळे काय झाले याची आहे. चीनमध्ये एक भयंकर प्रकरण समोर आले आहे, त्यानंतर लोकं आता जेवणात मिर्चीचा वापर करायलाही घाबरत आहेत. चीनच्या जिआंग्सु प्रांतात एका व्यक्तीने जेवणात खूप मिर्ची असलेले मोमोज (Dumplings) खाल्ले. थोड्या वेळातच या व्यक्तीच्या पोटात दुखू लागले. एवढेच नाही तर, त्याच्या पोटातून आवाजही येते होते. त्यामुळं थेट रुग्णालयात गेला. रुग्णालयात ही व्यक्ती गेल्यानंतर या व्यक्तीच्या आतड्यांचा स्फोट (Bowel burst) झाल्याचे समजले. या प्रकारानंतर डॉक्टरही घाबरून गेले. डेली मेलच्या वृत्तानुसार, या व्यक्तीस आधीपासून पोटाचे विकार होते. त्यामुळे त्याला मसालेदार पदार्थ खाण्यास मनाई केली होती. मात्र 63 वर्षीय वांग यांनी डॉक्टरांचा सल्ला न मानता मिर्ची असलेले मोमोज खाल्ले. मात्र याचा परिणाम खूपच वाईट झाला. वाचा- विमानात मास्कवरून राडा, सहप्रवाश्यांनी तरुणाला कपडे काढून केली मारहाण

वाचा- VIDEO: …आणि एका क्षणात झाले ट्रॅक्टरचे दोन तुकडे, बाइक चालकाचा मृत्यू वांग यांनी सांगितले की, तिखट मोमोज खाल्ल्यानंतर त्यांना पोटात स्फोट झाल्याचा भास झाला. म्हणून ते थेट डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जेव्हा वांग यांना रुग्णालयात आणले गेले तेव्हा त्याला पोटात तीव्र वेदना होत होत्या. मात्र जेव्हा टेस्ट करण्यात आल्या, तेव्हा पोटाची स्थिती पाहून सर्वच घाबरले. वाचा- CCTV VIDEO: हम तो उड गये! हवेत उडून महिलेवर आदळला रिक्षा चालक

वाचा- …आणि अचानक आकाशातून खाली पडताना दिसली उल्का, अद्भुत VIDEO VIRAL थोडक्यात वाचला जीव डॉक्टरांनी एका स्थानिक मीडियाला दिलेल्या माहितीत, या व्यक्तीला याआधीही पोटाचे विकार होते. त्यांना आताड्यांचाही त्रास होता. या आजारपणात अन्न आतड्यांत अडकते, ज्यानंतर पोटात तयार होणारा गॅस बाहेर पडू शकत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने मसालेदार मोमोज आणि त्यानंतर तिखट सूपही प्यायले. यामुळे त्याच्या पोटात वेगवान गॅस तयार झाला, मात्र अन्न आतड्यांमधे अडकल्यामुळे गॅस बाहेर जाऊ शकला नाही आणि पोटात स्फोट झाला. अथक प्रयत्नानंतर वांग यांना वाचवण्यात यश आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या