वॉशिंग्टन, 11 मार्च : अनेक जण नशिबावर विश्वास ठेवत नाहीत; पण नशीब ही अशी गोष्ट आहे, ज्यामुळे एखादी गरीब व्यक्ती अचानक श्रीमंत होऊ शकते, तर एखादी श्रीमंत व्यक्ती रस्त्यावर येऊ शकते. नशिबापुढे सगळे तर्क चुकतात. याच नशिबाच्या जोरावर 30 वर्षांच्या एका तरुणाने रतन टाटांच्या संपत्तीलाही मागे टाकेल इतकी संपत्ती कमावली. यामुळे तो जगातल्या श्रीमंत व्यक्तींमध्ये गणला जाऊ लागला आहे. सध्या रतन टाटांची खासगी मालमत्ता सुमारे 4000 कोटी रुपये आहे. हा तरुण एका क्षणात 16 हजार कोटींहून अधिक संपत्तीचा मालक बनला आहे. एवढंच नाही तर आता त्याचे छंदही महागडे झाले आहेत.
एडविन कॅस्ट्रो असं या अमेरिकन तरुणाचं नाव आहे. नोव्हेंबर महिन्यात त्यानं 2 अब्ज डॉलर्सची एक लॉटरी जिंकली. भारतीय चलनामध्ये त्याची किंमत 16,407 कोटी रुपये इतकी आहे. अमेरिकेच्या इतिहासातली ही सर्वांत मोठी लॉटरी आहे. जगभरातल्या माध्यमांमध्ये त्याची चर्चा झाली; पण एवढी मोठी रक्कम जिंकूनही हा तरुण जगासमोर आला नाही. त्याने आता जगातल्या सर्वांत महागड्या भागात एक महाल विकत घेतला आहे. या राजवाड्याची किंमत 200 कोटींहून अधिक असल्याचं सांगितलं जातंय. 'इंडिपेंडंट' या ब्रिटिश न्यूजपेपरच्या रिपोर्टनुसार, या मुलाने अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये सुमारे 25 मिलियन डॉलर्समध्ये एक महाल विकत घेतला आहे. तिथे अनेक हॉलिवूड कलाकारांची घरं आहेत.
Social media वरील Like मुळे Life ची वाट! तरुणासोबत भयंकर घडलं; पाहा VIDEO
एका अहवालानुसार, कॅस्ट्रो यानं लॉटरीचे पैसे एकरकमी घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कर आणि इतर कपात करून त्याला एकूण 997 मिलियन डॉलर्स म्हणजे 8180 कोटी रुपये मिळाले. आता डर्ट या एका रिअल इस्टेट वेबसाइटने त्याच्या नव्या घराबाबत माहिती दिली आहे. डर्ट या वेबसाइटच्या माहितीनुसार, कॅस्ट्रोनं कॅलिफोर्नियाच्या सबअर्बन हॉलिवूड हिल्समध्ये स्वतःसाठी एक महाल विकत घेतला आहे.
या राजवाड्याची किंमत 30 मिलियन डॉलर होती, पण कॅस्ट्रोला 5 मिलियन डॉलर्सची सूट मिळाली. या राजवाड्याचं क्षेत्रफळ 13,578 स्क्वेअर फूट इतकं आहे. यात 5 बेडरूम्स, 6 टॉयलेट-बाथरूम्स आणि 2 पावडर रूम आहेत. हा तीन मजली महाल भव्य आणि देखणा आहे. तळमजल्यावर काचेच्या भिंती आहेत. बाहेरच्या भागात स्वयंपाकघर आहे. या राजवाड्याच्या बाजूलाच जिम, चित्रपटगृह, वाइन सेलर, स्विमिंग पूल अशा सर्व अत्याधुनिक सोयी आहेत. यात खासगी बाल्कनी आणि रूफटॉप डेकही आहे. या वाड्यात 2 मोठी गॅरेजेस आहेत. तिथे किमान 7 गाड्या ठेवता येऊ शकतात. हॉलीवूड हिल्स हा कॅलिफोर्नियातल्या सर्वांत उच्चभ्रू भाग आहे. इथं घराची सरासरी किंमत 1.9 मिलियन डॉलर्स इतकी आहे.
बँक लुटायला गेला अन् चोरले 82 रूपये; मग स्वतःच पोलिसांना फोन करून अटकेसाठी केली विनंती, कारण...
केवळ नशिबाच्या जोरावर एका लॉटरीद्वारेही श्रीमंत होता येतं याबाबत आता आश्चर्य वाटायला नको.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.