JOIN US
मराठी बातम्या / Viral / हेल्मेट सोडा याचं तर शीरच झालं गायब; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप

हेल्मेट सोडा याचं तर शीरच झालं गायब; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप

धड आहे पण शीर नाही, अशा हॉरर बाईकस्वाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 जून :  धड आहे पण शीर नाही (Man without head)… असं काही फिरताना दिसलं तर साहजिकच आपण त्याला भूत म्हणू. सध्या अशाच एका विचित्र बाईकस्वाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्याला पाहून तुम्हालाही धक्का बसेल. हा भूत आहे की कोण असाच प्रश्न तुम्हाला पडेल. सूटबूट घालून धड असलेली आणि शीर नसलेली विचित्र व्यक्ती बाईकवरून रस्त्यावर फिरताना दिसते आहे. बरं ही व्यक्ती रात्रीअपरात्री नव्हे तर अगदी दिवसाढवळ्या गर्दीत रस्त्यावर फिरताना दिसते आहे.

संबंधित बातम्या

बाईक चालवताना डोक्यावर हेल्मेट घालावा असा नियम आहे. पण हेल्मेट घालण्यासाठी आधी डोकं तर असायला हवं. या बाईकस्वाराने हेल्मेट घालणं सोडा त्याचं शीरच नाही आहे. हे वाचा -  Shocking! तरुणीला हवेत स्टाइलमध्ये उडवलं आणि… हृदयाचा ठोका चुकवणारा Video व्हिडीओत पाहू शकता. सिग्नल लागलेला आहे. तिथं सर्व गाड्या थांबल्या आहेत आणि तितक्या एक बाईकस्वार तिथं येतो. हा बाईकस्वार मानेपासून पायापर्यंत तर एकदम नीट आहे. पण त्याचं शीर मात्र धडावर नाही. त्याने आपल्या शरीरावर सूटही चढवलेला आहे. सिग्नलवर थांबलेला प्रत्येक वाहनचालक आणि प्रवासी त्याला पाहून हैराण झाल आहे. हे वाचा -  धावत्या ट्रेनमधून चिमुकली पडली खाली; मुलीला वाचवण्यासाठी आईनं केलं जीवाचं रान jaat_k_jokes या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिड़ीओ शेअर करण्यात आला आहे. यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या