व्हायरल व्हिडीओ
नवी दिल्ली, 5 मार्च : हृदय विकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे अनेकांना आपला जीवदेखील गमवावा लागला आहे. सोशल मीडियावर असे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये कोणीही व्यक्ती मंदिरात डोकं टेकवताना, नाचताना, चालता चालता अचानक जीव गमावत आहे. अशीच एक घटना समोर आली असून याचा सीसीटीव्ही व्हिडीओदेखील समोर आला आहे. सध्या समोर आलेल्या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून यामध्ये व्यक्तीचा मृत्यूदेखील कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती घरातून तयार होऊन ऑफिसला निघताना दिसत आहे. त्याच्या हातात एक पिशवीही दिसत आहे. त्यानंतर तो लिफ्टजवळ जातो, बटण दाबतो आणि त्याची वाट पाहू लागतो. या दरम्यान त्यांची तब्येत बिघडू लागते. व्यक्ती बॅग जमिनीवर ठेवते आणि काही वेळ बाहेरची हवा खाण्यासाठी इमारतीच्या खिडकीतून बाहेर बघते. त्याचवेळी व्यक्ती खाली कोसळते आणि मृत्यू होतो.
ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे बघून आता सोशल मीडिया यूजर्स चांगलेच हैराण झाले आहेत. लोकांच्या मनात भीतीदेखील निर्माण झाली असून अशी प्रकरणे वारंवार समोर येत आहेत. कधीही, कोणाला, कुठेही हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमवावा लागतोय.
दरम्यान, हा व्हिडिओ ट्विटरवर @ajaychauhan41 नावाच्या प्रोफाइलसह शेअर करण्यात आला आहे. काही वेळात हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ खूप कमेंट देखील येत आहेत.