चोराची फजिती
नवी दिल्ली 28 जुलै : तुम्ही कधी चोराचा प्लॅन फसल्याचं आणि तोच अडचणीत आल्याचं पाहिलं आहे का? आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत, जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. तुम्ही आतापर्यंत चोरीशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहिलं असेल. मात्र ट्विटर या सोशल प्लॅटफॉर्मवर सध्या चोरीचा जो व्हिडिओ दिसत आहे, ते पाहून तुम्हालाही हसू येईल. यात घडलं असं, की महिलेची पर्स हिसकावून घेण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती बसमध्ये चढला होता. बसमध्ये चढताच त्या व्यक्तीने महिलेची पर्स हिसकावून घेण्यास सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात तो पर्स हिसकावू शकला नाही, त्यामुळे चुकून त्याचा हात पर्सला लागला, असं दाखवण्यासाठी तो हसू लागला. मात्र पहिला प्रयत्न फेल जाताच लगेचच त्याने पुन्हा पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्यांदाही तो पर्स चोरण्यात अयशस्वी ठरला, त्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न सुरू केला. तो व्यक्ती पळण्यासाठी बसच्या दाराकडे येताच चालकाने दरवाजा लावून घेतला.
व्हिडिओमध्ये दिसतं, की हा चोरी करण्यासाठी एक चोर बसमध्ये चढला आहे. तर त्याचा साथीदार म्हणजेच दुसरा चोर दरवाजा बंद होऊ नये म्हणून खाली उभा होता. पर्स हिसकावण्याचा प्रयत्न करणारा चोरटा पळून जाणारच होता की इतक्यात लगेचच गेट बंद झालं. त्याच्या साथीदाराने गेट बंद होण्यापासून रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला ते शक्य झालं नाही. कारण बस सुटली होती. हॉटेलमध्ये सुरक्षितपणे रात्र घालवायची असेल तर दरवाजाला नक्की अडकवा टॉवेल; कर्मचाऱ्याने सांगितलं कारण बसचा दरवाजा बंद केल्यानंतर चोरट्याने चालकाला दरवाजा उघडण्यास सांगण्यास सुरुवात केली. मात्र, चालकाने त्याचं म्हणणे न ऐकता काठी उचलली आणि गाडी चालवतच चोरट्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. चालकाकडून मारहाण झाल्यानंतर चोरट्यानेही रडायला सुरुवात केली. काही अंतर चालल्यानंतर चालकाने बस थांबवून चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.