मोबाईलच्या नादात पोटचं बाळ गायब झाल्याचंही समजलं नाही
नवी दिल्ली 24 जुलै : आजच्या काळात स्मार्ट फोन हा जणू मानवी जीवनाचा सर्वात महत्वाचा भाग बनला आहे. कोरोनाच्या काळात लोकांना घरात वेळ घालवला खरा, मात्र ते इतका वेळ घरात शांतपणे बसून राहिले, यात मोबाईल हे एक मोठं कारण होतं. पूर्वी लोक फोन फक्त आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत बोलण्यासाठी वापरायचे, पण आता बहुतेक लोक तो मनोरंजनासाठी वापरतात. मोबाईल वापरताना वेळ कसा निघून जातो हेही कळत नाही. पण हे खूप धोकादायकही ठरू शकतं. रस्त्यात किंवा कुठेही बसताना अनेकदा लोक त्यांच्या मोबाईलमध्ये हरवून जातात. त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचीही त्यांना पर्वा नसते. अशा परिस्थितीत अनेक वेळा एखादी व्यक्ती आपल्या मौल्यवान वस्तू गमावून बसते. त्यांचे लक्ष मोबाईल स्क्रीनमध्ये असतं आणि चोरटे याचा फायदा घेतात. ते तुमच्या मौल्यवान वस्तू कधी चोरतात हे तुम्हाला कळतही नाही. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मात्र, ही घटना म्हणजे महिलेला धडा शिकवण्यासाठी केलेला प्रँक होती.
व्हिडिओमध्ये एक महिला रस्त्यावर उभी असल्याचं दिसत आहे. तिच्या हातात एक स्ट्रोलर होता, ज्यात तिचं बाळ होतं. सायंकाळी ही महिला आपल्या मुलाला घेऊन फिरायला बाहेर पडली होती. पण वाटेत तिचं सगळं लक्ष मोबाईलवर होतं. फोनमध्ये बघत असताना ती मुलाकडे पाठ करून उभी होती. दरम्यान, एक व्यक्ती आला आणि गुपचूप तिच्या मुलाला स्ट्रोलरमधून उचलून घेऊन गेला. मात्र महिलेचं लक्ष फक्त फोनमध्ये होतं. आपल्या मुलाला कोणीतरी पळवून नेलं आहे, हेदेखील तिला समजलं नाही. शेजारी चित्ता तरीही बेधडकपणे गवत खात होतं हरिण, Video पाहून व्हाल थक्क बाळ गायब झाल्यानंतरही महिलेला आपलं मूल स्ट्रोलरमध्ये नसल्याचं बराच काळ लक्षात आलं नाही. ती बराच वेळ रिकामं स्ट्रोलर फिरवताना दिसली. पण जेव्हा तिचं लक्ष फोनमधून बाहेर गेलं तेव्हा तिला धक्काच बसला. बाळ गायब झालं होतं. ती बाळाला शोधण्यासाठी इकडे तिकडे धावू लागली. मात्र काही वेळातच एका व्यक्तीने येऊन तिचं बाळ परत केलं. व्हिडिओ पाहून असं लक्षात येतं, की महिला त्या व्यक्तीला ओळखत होती. या व्यक्तीला फक्त त्या महिलेला धडा शिकवायचा होता, की मोबाईलमुळे माणसाची मौल्यवान वस्तू कशी गायब होऊ शकते. लोकांना जागरूक करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे