JOIN US
मराठी बातम्या / Viral / मध्यरात्रीच जोडप्याच्या घरात येऊ लागले अजब आवाज; बेडरूमचा दरवाजा उघडताच हादरला नवरा

मध्यरात्रीच जोडप्याच्या घरात येऊ लागले अजब आवाज; बेडरूमचा दरवाजा उघडताच हादरला नवरा

एका जोडप्यालाही वाटलं, की आपल्या घरात चोर शिरले आहेत. जेव्हा त्यांच्या घरात मध्यरात्री काहीतरी आवाज ऐकू आला

जाहिरात

घरात दिसली मगर (प्रतिकात्मक फोटो)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 01 जुलै : आजच्या काळात चोरीच्या घटना खूप वाढल्या आहेत. एखादं घर काही दिवसांसाठी बंद असलं की तिथे चोरीच्या घटना घडतात. मात्र आता चोरट्यांची हिंमत एवढी वाढली आहे, की त्यांनी खुलेआम घरफोडी सुरू केली आहे. अमेरिकेतील लुसिआना येथे राहणाऱ्या एका जोडप्यालाही असंच वाटलं, की आपल्या घरात चोर शिरले आहेत. जेव्हा त्यांच्या घरात मध्यरात्री काहीतरी आवाज ऐकू आला. चोरीच्या उद्देशाने कोणीतरी चोरटे घरात घुसले असावेत, असं त्यांना वाटले. पण वास्तव काही वेगळंच होतं. Ajab Gajab : समुद्राच्या तळाशी सापडल्या अशा विचित्र गोष्ट, पाहून शास्त्रज्ञांनाही बसत नाही विश्वास ही घटना 24 जूनची आहे. मध्यरात्री या जोडप्याच्या पाळीव कुत्र्याने जोरजोरात भुंकायला सुरुवात केली. त्यांच्या घरात चोर घुसल्याचं दाम्पत्याला वाटलं. हिंमत एकवटून नवऱ्याने खोलीत ठेवलेलं पिस्तूल काढलं आणि चोराला सामोरे जाण्याचं ठरवलं. मात्र बाहेर येताच वेगळंच काहीतरी दिसलं. तिथे चोर नसून पाच फुटांचा मृत्यू पाहून तो हादरला. होय, त्यांच्या घरात पाच फुटांची मगर घुसली होती. डॉनने सांगितलं की, या मगरीने कुत्र्याच्या दारातून घरात प्रवेश केला होता. संपूर्ण हॉलमध्ये ती आरामात फिरत होती. डॉनला मगरी दिसताच त्याने तत्काळ Fish and Wildlife Department ला फोन केला. काही वेळातच टीम आली आणि मगरीला पकडून घेऊन गेली. अंधारात घरातून आवाज येत असल्याने डॉनची पत्नी चांगलीच घाबरली होती. ती खोलीतून बाहेरही आली नाही. डॉन एकटाच पिस्तुल घेऊन बाहेर पडला. मात्र तिथे चोराऐवजी मगर दिसल्याने त्याला आश्चर्य वाटलं. सुदैवाने या मगरीने कोणावरही हल्ला केला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या