JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - कारखाली चिरडण्यापासून वाचला पण...; पुढच्याच क्षणी तरुणावर असं संकट कोसळलं की भरेल धडकी

VIDEO - कारखाली चिरडण्यापासून वाचला पण...; पुढच्याच क्षणी तरुणावर असं संकट कोसळलं की भरेल धडकी

एका संकटातून वाचता वाचता तरुणासोबत घडली दुसरी भयंकर दुर्घटना.

जाहिरात

तरुणासोबत विचित्र दुर्घटना.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 ऑक्टोबर : अपघाताचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ असे असतात की ते खूपच धक्कादायक असतात. अशाच एका विचित्र अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एक व्यक्ती कारखाली चिरडण्यापासून वाचते. पण तिच्यावरील संकट टळत नाही. पुढच्याच क्षणी त्या व्यक्तीसोबत दुसरी दुर्घटना घडते. आगीतून फुफाट्यात… असंच या व्यक्तीसोबत घडलं. एका संकटातून वाचता वाचता ही व्यक्ती दुसऱ्या संकटात अडकते. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक कार भरधाव वेगाने येत आहे. त्याच कारच्या आत कॅमेरा आहे. ज्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. हे वाचा -  VIDEO - चालत्या ट्रेनमधून उतरण्याचं महिलेने धाडस केलं अन्…; गोंदिया रेल्वे स्टेशनवर भयंकर घडलं सुरुवातीला समोरून एक कार येताना दिसते. विरुद्ध दिशेने दुसरी कार भरधाव येते. ही कार समोरून येणाऱ्या कारला धडक बसू नये, म्हणून आपला मार्ग बदलते. ती कार फुटपाथवर जाते आणि अचानक ब्रेक मारते. तेव्हा फुटपाथवर एक व्यक्ती उभी असते. कारला आपल्या दिशेने येताना पाहून ती व्यक्ती आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळते तोच… व्यक्ती कारखाली चिरडण्यापासून तर बचावते पण तिच कार तिथल्या एका साइन बोर्डला धडकते आणि तो बोर्ड त्या व्यक्तीवर पडतो. ती व्यक्ती धाडकन खाली कोसळते.

संबंधित बातम्या

ज्या कारमुळे हा अपघात झाला आहे, त्या कारमध्ये कॅमेरा आहे आणि याच कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हे वाचा -  Reel करणाऱ्या मुलांनी बस ड्रायव्हरला बनवलं मूर्ख, Video सोशल मीडियावर व्हायरल @_BestVideos ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या