JOIN US
मराठी बातम्या / Viral / अचानक समोर आला बंदूकधारी चोर; पाहताच व्यक्तीने जे केलं ते चक्रावून सोडणारं, video

अचानक समोर आला बंदूकधारी चोर; पाहताच व्यक्तीने जे केलं ते चक्रावून सोडणारं, video

सध्या एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यातील व्यक्तीची हिंमत पाहून सगळेच चक्रावून गेले

जाहिरात

चोरासमोर आरामात बसून राहिला व्यक्ती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 18 जून : जगात असे अनेक लोक आहेत, जे आपल्या हिंमतीच्या जोरावर काहीही करतात. आयुष्यात कितीही संकटं आली तरी ते त्याला हसत सामोरे जातात. मात्र, आजकालचं आजूबाजूचं वातावरण बघता, कधीकधी अशा प्रकारचं धाडस आपल्याच जीवावर बेतू शकतं. विशेषत: सशस्त्र दरोडेखोरांच्या समोर हिंमत दाखवण्याची चूक कधीही करू नका, नाहीतर क्षणार्धात आपला जीव गमवावा लागू शकतो. परंतु अनेक वेळा असं घडतं की, काही लोक सशस्त्र गुन्हेगारांना न घाबरता त्यांच्यासमोर उभे राहतात. बापरे! इतकं भयानक वादळ; बघता बघता हवेत उडाले लोक, थरकाप उडवणारा VIDEO सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यातील व्यक्तीची हिंमत पाहून सगळेच चक्रावून गेले. प्रकरण असं आहे की एका बारमध्ये काही लोक आरामात बसून दारू पीत असतात, तेव्हाच एक सशस्त्र चोर लुटण्याच्या उद्देशाने तिथे पोहोचतो. अशा स्थितीत त्याच्या भीतीने सगळे लोक इकडे तिकडे लपून बसतात, पण एक माणूस न घाबरता अगदी आरामात आपल्या जागेवर बसून राहतो. मग काय, तो चोर लगेच तिथे पोहोचतो आणि त्या व्यक्तीच्या हातातून मोबाईल हिसकावून घेण्यास सुरुवात करतो, पण ती व्यक्ती त्याला मोबाईल द्यायला तयार नसते.

संबंधित बातम्या

चोर त्याला काहीही करत नाही आणि तो टेबलच्या पलीकडे जाऊन पैसे शोधू लागतो. त्याचवेळी, ती व्यक्ती आरामात समोर बसून सिगारेट पेटवते आणि दारू पिऊन मजा घेताना दिसते. आता एवढं धाडस सशस्त्र चोरासमोर दाखवायचं धाडस कोणात असेल. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @cctvidiots नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. सुमारे एक मिनिटाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 5.9 दशलक्ष म्हणजेच 59 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 24 हजारांहून अधिक लोकांनी लाईक देखील केला आहे आणि विविध मजेदार कमेंट्स केल्या आहेत. हा नवा जेम्स बाँड आहे, असं काहीजण गमतीने म्हणत आहेत. तर काहीजण म्हणत आहेत, की त्या व्यक्तीच्या धाडसाचे कौतुकच करावे लागेल की तो शस्त्र बाळगणाऱ्या चोरालाही घाबरला नाही आणि आपले काम करत राहिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या