मुंबई, 26 मार्च : मुके जीव ज्यांना बोलता येत नसलं तरी त्यांच्यात भावना मात्र असतात. त्यांच्या मदतीला धावून आलेल्यांना ते कधीच विसरत नाहीत, याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका व्यक्तीने एका हरणा चा जीव वाचवला. या कर्माचं त्या व्यक्तीला असं फळ मिळालं की ते पाहून ती व्यक्तीसुद्धा थक्क झाली. हरणाने त्या व्यक्तीसोबत जे केलं ते पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही. प्राण्यांचे तसे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण हा व्हिडीओ तितकाच खास आहे. असे व्हिडीओ क्वचितच पाहायला मिळतात. असा हत्ती तुम्ही पाहिलाच नसेल; दुर्मिळ हत्तीचा VIDEO सोशल मीडियावर तुफान VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक हरण तारेत अडकलेलं दिसतं आहे. एक व्यक्ती तिथून जाताना त्या हरणाला पाहते. त्याला वाचवण्यासाठी त्याच्याजवळ जाते. तारेत अडकलेल्या हरणाची सुटका करते. हरण घाबरलं आहे, जखमी झालं आहे. तारेतून सुटल्यानंतरही ते पळून जात नाही तर नंतर तिथंच शांत बसतं. ती व्यक्तीही हरणाची भीती दूर करण्यासाठी त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवते. त्यानंतर ती आपल्या घरी येते. त्यानंतर या व्यक्तीसोबत पुढे जे घडतं ते थक्क करणारं आहे.
व्हिडीओत तुम्ही पुढे पाहा तर ज्या व्यक्तीने या हरणाला वाचवलं हरण त्या व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचतं. यावेळी ते एकटं नाही तर आपली फौजच घेऊन आलं आहे. हरणाचा कळप या व्यक्तीच्या घरी पोहोचतं. आपला जीव वाचवणाऱ्या व्यक्तीचे हरिण आभार मानायला येतं. त्याचे साथीदारही आपल्या साथीदाराला जीवनदान देणाऱ्याचे आभार मानायला त्याच्यालोबत पोहोचतात.
हरीण तारेवरून उडी मारून ते ओलांडण्याचा प्रयत्न करत होतं, पण त्याला ते जमलं नाही ते त्या तारेतच अडकलं. या व्यक्तीने त्याचे मागील दोन्ही पाय उचलले आणि वर करत त्याला अलगद आत ढकललं.