नवी दिल्ली 05 मार्च : सापाला घाबरत नाहीत, अशी लोक अतिशय कमीच पाहायला मिळतात. साप समोर दिसताच अनेकांना घाम फुटतो. लहान दिसणारा हा जीव अतिशय विषारीही असतो. अनेकदा साप चावल्यास लोकांना आपला जीवही गमवावा लागतो. मात्र काही लोक न घाबरता अगदी सहज साप पकडतात. सुपर मार्केटमधून आणली 1 डझन केळी, त्यात लपलेली भयंकर गोष्ट पाहून फुटला घाम सध्या असाच एक व्हिडिओ (Rescue Operation of King Cobra) समोर आला आहे. या घटनेत ओडिसाच्या एका गावामध्ये अतिशय जुन्या घराच्या छतावर अतिशय विषारी किंग कोब्रा साप होता. या सापाला पाहताच गावकऱ्यांना घाम फुटला. यानंतर लगेचच साप पकडण्यात एक्सपर्ट असलेल्या आणि Youtube वर आपल्या कारनाम्यांमुळे ओळखल्या जाणाऱ्या साप विशेषतज्ञ मुरलीवाले हौसला यांना बोलावण्यात आलं. किंग कोबराला पकडतानाचा त्यांचा हा व्हिडिओ Murliwale Hausla नावाच्या चॅनेलवर अपलोड होताच व्हायरल (Shocking Video of Cobra) झाला.
किंग कोब्राला पकडण्यासाठी हा व्यक्ती घराच्या आतमध्ये गेला आणि आजूबाजूच्या गोष्टी पाहिल्या तेव्हा त्याला समजलं की साप नक्कीच कुठेतरी दडून बसलेला असणार. थोडं पुढे जाताच त्याची नजर छतावर असलेल्या विषारी किंग कोब्रावर पडली. यानंतर सुरू झाले सापाला बाहेर काढून पकडण्याची तयारी. आपला जीव धोक्यात टाकून या व्यक्तीने छातवर असलेल्या सापाची शेपटी पकडली आणि त्याला खाली खेचलं.
अनेक प्रयत्नानंतरही किंग कोब्रा बाहेर यायला तयार नव्हता. जणू त्यालाही माहिती होतं की पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत काय होणार होतं. हा व्यक्ती सापाला बाहेर ओढू लागताच साप अधिकच आक्रमक होत होता. सापाने वारंवार या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने या व्यक्तीने प्रत्येक वेळी स्वतःला या हल्ल्यापासून वाचवलं. हा कोब्रा जवळपास 15 फूट लांब होता. बऱ्याच वेळ प्रयत्न केल्यानंतर अखेर सापाला पकडण्यात यश आलं. सध्या हा व्हिडिओ यूट्यूबवर लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.