प्रतीकात्मक फोटो
बीजिंग, 27 जुलै : एटीएम म्हणजे पैसे काढण्याचं मशीन. मात्र अनेक ठिकाणी पैसे जमा करण्यासाठीही एटीएम चा वापर केला जातो. तुमच्या खात्यात पुरेशी शिल्लक असतानाच तुम्ही पैसे काढू शकता. नाहीतर पैसे काढायला गेल्यावर तुमच्या बँक अकाऊंटमध्ये पुरेसा बॅलेन्स नाही असा मेसेज येतो. असाच मेसेज एका व्यक्तीला आला. पण त्याने आपला बँक बॅलेन्स वाढवण्यासाठी खतरनाक जुगाड केला. चीनच्या जिआंगशी प्रांतातील हे प्रकरण आहे. झेंग नावाची एक व्यक्ती एटीएममध्ये पैसे काढायला गेली. पण बँकेत पुरेसा बॅलेन्स नसल्याने पैसे काही आले नाहीत. या व्यक्तीने एटीएममधूनच डिपॉझिट करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने एटीएममध्ये पैसे नाही तर भलतंच काहीतरी टाकलं. जे पाहून सर्वांनाच धक्का बसला.
तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याने चक्क जॉस पेपर एटीएममध्ये टाकला. हा पेपर एटीएममध्ये टाकला तर एटीएमला खात्यात पैसे जमा झाल्यासारखे वाटतील आणि पैसे काढता येतील, असं या व्यक्तीला वाटलं. यानंतर ही व्यक्ती आपल्या बँक खात्यात पैसे आले की नाही हे तपासण्यासाठी दुसऱ्या एटीएममध्ये गेली. पण जसं तिला वाटलं तसं बिलकुल झालं नाही. Weird Job - ना डिग्री, ना मेहनत, फक्त बसल्या बसल्या तासाला 7 हजार रुपये कमवते ही महिला; कसं ते पाहा जिथं या व्यक्तीने हे कागद टाकले ते एटीएम मशीन खराब झालं होतं. याचा तपास केला असता या व्यक्तीचं हे कृत्य समोर आलं. सीसीटीव्ही फुटेजमध्येही ही व्यक्ती एटीएममध्ये कागद टाकताना दिसली. या व्यक्तीची चौकशी केली असता आणखी एक विचित्र गोष्ट समोर आली. या व्यक्तीने सांगितलं की, त्याचे पैसे संपले होतो म्हणूनच त्याने विचार केला की जर त्याने नोटांसारखे दिसणारे हे कागद ठेवले तर कदाचित तो जास्त पैसे काढू शकेल कारण ते वर येतील. जॉस पेपर हा असा कागद आहे. जो चीनचे अधिकृत चलन किंवा चिनी बँक नोटांसारखे दिसतं. तिथल्या धार्मिक किंवा मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या विधींसाठी हा वापरला जातो. कोणाचा मृत्यू झाला की हा कागद अगरबत्तीने जाळला जातो. तो त्या व्यक्तीसोबत दफनही केला जातो जेणेकरून ते मृत्यूनंतर वापरू शकतील. या कागदांचा आकार चलनी नोटांपेक्षा वेगळा असतो. त्यामुळे एटीएममध्ये टाकताच एटीएम बिघडलं. आर्टिस्ट डुक्कर! काढली अशी पेटिंग्स, खरेदीसाठी गर्दी; किंमत तब्बल 10 कोटी दरम्यान पोलिसांनी बँक बॅलेन्स वाढवण्यासाठी नको तो प्रताप करून एटीएम बंद पाडणाऱ्या झेंगला अटक केली आहे.