JOIN US
मराठी बातम्या / Viral / तरुणाचं भलतच धाडस, कॉस्ट्यूम घालून पोहोचला खऱ्या मगरीजवळ छेड काढताच... संपूर्ण प्रकार व्हिडीओत कैद

तरुणाचं भलतच धाडस, कॉस्ट्यूम घालून पोहोचला खऱ्या मगरीजवळ छेड काढताच... संपूर्ण प्रकार व्हिडीओत कैद

ही मंडळी आपलं साहस सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे स्टंट करत असतात. मग त्याचे परिणाम काहीही असोत, याचा विचार कोणीच करत नाही.

जाहिरात

धोकादायक व्हिडीओ व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जुलै : स्टंटचे व्हिडीओ तुम्हाला सोशल मीडियावर हमखास पाहायला मिळतील. काही थोड्याशा व्ह्यूज किंवा प्रसिद्धीसाठी काही लोक वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवतात. पण कधी कधी असा प्रकार अंगाशी येतो, ज्यामुळे काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. तर अनेकांनी आपले प्राणी देखील कमावले आहेत. पण असं असलं तरी देखील काही लोक यातून काही शिकत नाहीत. ही मंडळी आपलं साहस सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे स्टंट करत असतात. मग त्याचे परिणाम काहीही असोत, याचा विचार कोणीच करत नाही. यासंबंधीचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मगरीचा पोशाख घातलेला एक माणूस खऱ्या मगरीजवळ गेला आणि नंतर तिची छेड काढू लागला. त्यानंतर काय घडलं तुम्हीच पाहा… रात्रीच्या अंधारात का चमकू लागतात प्राण्यांचे डोळे? रंजक आहे यामागचं कारण या व्हिडीओमध्ये या व्यक्तीला काहीही झालेलं नाही, या उलट मगरच त्याला घाबरुन पळून गेली. पण यासाठी या व्यक्तीचं नशीब चांगलं आहे, असंच म्हणावं लागेल. कारण जर मगरीने त्याच्यावर हल्ला केला असता तर ते त्याच्या जीवावर देखील बेतलं असतं.

हा व्हिडीओ एका युट्यूब अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला भरभरुन लाईक आणि शेअर मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून तो परदेशातील असल्याचे दिसत आहे नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर आपलं वक्तव्य देखील केलं आहे. काही लोकांनी या व्यक्तीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे, तर काहींनी याला मुर्खपणाचं असल्याचं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या