प्रतिकात्मक फोटो
दिल्ली, 26 जुलै : सध्याचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे. सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसवतात, तर काही व्हिडीओ अंगाचा थरकाप उडवतात. उत्तर प्रदेशामधील असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक तरूण उंदराला आपल्या गाडीखाली चिरडून ठार मारत असल्याचं दिसत आहे. कधी-कधी आपल्या घरी उंदीर उच्छांद मांडतात. अशात आपण त्यांना मारण्यासाठी कधी औषध तर कधी काठीचा वापर करतो. इथ पर्यंत सर्व ठिक आहे. परंतू असं असलं तरी देखील उंदरांना मुद्दाम अमानुष पणे मारणं हे फारच चुकीचं आहे. असंच जेव्हा एका व्यक्तीनं रस्त्यावर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र त्याला शिक्षा ठोठावली गेली. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये उंदीर मारल्याचं प्रकरण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. या हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यामध्ये आरोपी उंदराला क्रूरपणे चिरडताना दिसत आहे. उंदराला चिरडून मारणाऱ्या आरोपी तरुणाचे नाव जैनुद्दीन आहे. तो नोएडातील सेक्टर-66 मध्ये ममुरा गावात खान बिर्याणी नावाचं दुकान चालवतो. सध्या पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर या घटनेबाबत लोकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. नोएडातील उंदराला चिरडून मारल्याच्या या क्रूर व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.