नवी दिल्ली 11 मे : अनेक लोकांना प्राणी पाळण्याची खूप आवड असते. बहुतेक लोकांना कुत्रा किंवा मांजर पाळणं आवडतं. अनेकदा अशी वेळही येते जेव्हा या लोकांचा आपल्या पाळीव प्राण्यांवर इतका जीव जडतो की ते स्वतःच्या जीवापेतक्षाही महत्त्वाचे वाटू लागतात. याची अनेक उदाहरणं याआधीही समोर आली आहेत. आता याच्याशी संबंधित आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एका व्यक्तीचं आपल्या पाळीव श्वानावर असलेलं प्रेम दिसतं (Man Jumps into Fire to Save Dog). मालकासाठी काहीही! चक्क कार चालवताना दिसला श्वान; VIDEO पाहून बसणार नाही डोळ्यांवर विश्वास सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) एका ठिकाणी आग लागल्याचं दिसत आहे. आग लागलेल्या ठिकाणासमोर गाड्याही उभ्या आहेत. त्याचवेळी अग्निशमन दलाचे जवान गाड्यांसमोरील आगीवर नियंत्रण मिळवण्यात व्यस्त आहेत. इतक्यात एक व्यक्ती तिथे येतो आणि आग लागलेल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो.
अखेर हा व्यक्ती त्या ठिकाणी जातोच जिथे आग लागलेली असते. या व्यक्तीने एवढा मोठा धोका पत्करून आणि आपला जीव धोक्यात घालून आगीत जाण्याचा निर्णय का घेतला, हे कोणाचा समजत नाही. मात्र, काही वेळानंतर जे दृश्य दिसतं की थक्क करणारं आहे. हा व्यक्ती आगीतून बाहेर येतो, तेव्हा त्याच्यासोबत एक श्वान तिथून बाहेर येताना दिसतो. गेटमधून बाहेर येताच वळूने शिंगावर उचललं; मग जमिनीवर आपटून पायांनी तुडवलं, थरारक VIDEO यानंतर हे प्रकरण नेमकं काय आहे ते समजतं. व्हिडिओतून असं दिसतं की आग लागलेल्या ठिकाणी या व्यक्तीचा पाळीव श्वान अडकलेला होता आणि श्वानाला वाचवण्यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर 82 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. अनेकजण व्हिडिओवर कमेंट करत या व्यक्तीचं कौतुकही करत आहेत.