JOIN US
मराठी बातम्या / Viral / Video Viral : नूडल्सवर ताव मारत होता व्यक्ती, अचानक त्यातून बाहेर आलं जिवंत बेडूक अन्..

Video Viral : नूडल्सवर ताव मारत होता व्यक्ती, अचानक त्यातून बाहेर आलं जिवंत बेडूक अन्..

एक व्यक्ती रेस्टॉरंटमध्ये बसून मजेस नूडल्स खात होती, पण त्या नूडल्समध्ये एक विचित्र गोष्ट पडली होती, हे त्याला माहीत नव्हतं.

जाहिरात

नूडल्समधून बाहेर आलं जिवंत बेडूक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 01 जून : जगात असे काही लोक आहेत जे खाण्यापिण्याचे इतके शौकीन असतात की ते त्यासाठी कुठेही जायला तयार होतात. तसं अन्नाच्या बाबतीत प्रत्येकाची स्वतःची निवड असते. काहींना गोड पदार्थ जास्त आवडतात, तर काहींना मसालेदार पदार्थ आवडतात. अनेकदा असे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होतात, ज्यामध्ये लोक नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेताना दिसतात. असे व्हिडीओ पाहून अनेकदा तोंडाला पाणी सुटतं. पण सध्या असा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला उलटी येईल. खरंतर, एक व्यक्ती रेस्टॉरंटमध्ये बसून मजेस नूडल्स खात होती, पण त्या नूडल्समध्ये एक विचित्र गोष्ट पडली होती, हे त्याला माहीत नव्हतं. त्याने जवळपास सर्व नूडल्स खाल्ले तेव्हा त्यात बेडूक पडल्याचं दिसून आलं. हे पाहून त्याला धक्काच बसला, पण आता बिचारा काय करणार. त्याने सर्व नूडल्स संपवले होते. या व्यक्तीने या घटनेची एक छोटी क्लिपही सोशल मीडियावर शेअर केली आहे, जी त्याने नूडल्स खाल्ल्यानंतर आपल्या मोबाईल कॅमेऱ्याने शूट केली आहे. Video Viral: नाल्याजवळ आरामात उभा होता व्यक्ती; अचानक मागून पळत आलेल्या ‘सांड’ने केलं मोठं ‘कांड’ व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक छोटा बेडूक नूडल्सच्या कपमध्ये उडी मारताना दिसत आहे. या व्यक्तीने @kaito09061 नावाच्या अकाऊंटवरुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये संपूर्ण घटना सांगितली आहे.

संबंधित बातम्या

त्या व्यक्तीने सांगितलं की तो बिझनेस ट्रिपवर होता. यादरम्यान त्याने एका रेस्टॉरंटमधून कप नूडल्स ऑर्डर केले, ज्यामध्ये एक बेडूक पडला होता. परंतु त्याला याची कल्पना नव्हती. त्याने ते पूर्ण खाल्ले, मग त्याची नजर बेडकावर पडली. यानंतर त्याने तक्रार केली, यानंतर दुकान काही तासांसाठी बंद होतं. परंतु रात्री ते पुन्हा उघडलं आणि त्याच वस्तू ते पुन्हा विकू लागले, ज्यामध्ये त्याला बेडूक पडलेला आढळला होता. त्या व्यक्तीने लोकांना खाण्यापूर्वी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या