JOIN US
मराठी बातम्या / Viral / अनोखी Love Story! दिरावर जडलं 2 मुलांच्या आईचं प्रेम; पुढे पतीनं जे केलं ते वाचून हैराण व्हाल

अनोखी Love Story! दिरावर जडलं 2 मुलांच्या आईचं प्रेम; पुढे पतीनं जे केलं ते वाचून हैराण व्हाल

लग्नानंतर या व्यक्तीच्या पत्नीचं आपल्या दिरावर प्रेम (Love) जडलं. यानंतर महिलेच्या पतीनं हा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रांची 29 जुलै : सध्या एक अनोखं लग्न (Marriage) चर्चेचा विषय ठरत आहे. या घटनेत एका व्यक्तीनं आपल्याच लहान भावासोबत आपल्या पत्नीचं लग्न लावलं. ही घटना झारखंडच्या (Jharkhand) गिरिडीह येथील लचकन गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर या व्यक्तीच्या पत्नीचं आपल्या दिरावर प्रेम (Love) जडलं. यानंतर महिलेच्या पतीनं हा निर्णय घेतला आहे. 78 वर्षीय आजीच्या भन्नाट डान्सचा इंटरनेटवर धुमाकूळ; VIDEO नं जिंकली लाखोंची मनं जेव्हा या व्यक्तीला आपल्या पत्नी आणि भावाच्या नात्याबद्दल समजलं तेव्हा त्यानं आपल्या मर्जीनं भावाचं लग्न पत्नीसोबत लावलं. ही महिला दोन मुलांची आई आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला अचानक गुजरातच्या सुरतमध्ये पोहोचली. इथे तिचा पती आणि दीर काम करत असे. मात्र, सूरतमध्ये गेल्यानंतर पतीकडे जाण्याऐवजी ती दिराच्या घरी गेली. दोघंही सोबत राहू लागले होते आणि यादरम्यान दोघांनी आपले फोटोही सोशल मीडियावर अपलोड केले होते. 13 वर्ष खासदार अन् सर्वात सुंदर महिला होत्या गायत्री देवी; जेलमध्ये होत्या कैद जेव्हा महिलेच्या पतीला याबाबत माहिती झालं तेव्हा तो आपल्या भावाच्या घरी पोहोचला आणि तिथे जाऊन त्यानं दोघांशी बातचीत केली. या व्यक्तीनं आपला भाऊ आणि पत्नी दोघांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोघांनी एकमेकांसोबत राहाण्याचा आपला निर्णय त्याला कळवला. यानंतर पतीनं स्वतः आपल्या भावाचं आणि पत्नीचं लग्न करून दिलं आणि दोघांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. महिलेच्या पतीनं सांगितलं, की लग्नानंतर मला माहिती झालं की माझी पत्नी गावातील माझ्या भावाला पसंत करते. जेव्हा मला याबाबत माहिती झालं तेव्हा मी त्यांच्या मध्ये न येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचं लग्न लावलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या