मुंबई, 09 ऑगस्ट : सोशल मीडियावर बरेच जुगाड, फंडे व्हायरल होत असतात. काही टिप्स, काही ट्रिक्स दाखवल्या जातात. असाच एक तरुण दात घासण्यासाठी एक विचित्र जुगाड घेऊन आला. त्याने चक्क बंदुकीला साधा टूथब्रश जोडला आणि त्यानंतर दात घासण्यासाठी म्हणून त्याने बंदुकीची ट्रिगर दाबली. हा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. मार्केटमध्ये बरेच इलेक्ट्रॉनिक टूथब्रश मिळतात. हे ब्रश बॅटरीवर चालतात. फक्त हातात धरून ते तोंडात टाकावे लागतात बाकी तोंडाची सफाई हे ब्रश आपोआप करतात. या ब्रशची किंमतही जास्त असते. त्यामुळे या तरुणाने घरच्या घरीच इलेक्ट्रिक टूथब्रश बनवण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने बंदुकीचा वापर केला. हे वाचा - ना पॅराशूट ना हॉट एअर बलून; पक्ष्यासारखे पंख पसरून उडू लागला माणूस; पाहा अद्भुत VIDEO व्हिडीओत पाहू शकता तरुणाने साधा टूथब्रश घेतला आहे आणि तो बंदुकीत घुसवला. त्यानंतर त्याने बंदूक हातात धरून तोंडाजवळ नेली. तोंड उघडलं, बंदुकीला जोडलेला ब्रश तोंडात घातला आणि दात घासण्यासाठी त्याने ट्रिगर दाबली. त्यानंतर त्याचा ब्रश बंदुकीच्या ट्रिगरवर मागे पुढे होऊ लागला. जसं तो ट्रिगर दाबतो-सोडतो तसं टूथब्रश मागे-पुढे होतो.
इलेक्ट्रिक टूथब्रशसाठी तरुणाने सांगितलेला हा जुगाड खूपच विचित्र आहे. ही बंदूक असली आहे की नकली ते माहिती नाही. पण खरी बंदूक असेल तर यामुळे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून जितकं हसू येतं, तितकाच हा व्हिडीओ धक्कादायक आहे. हे वाचा - फ्लाइंग डोसा झाला आता ही ‘हेलिकॉप्टर भेळ’ बघितली का? सोशल मीडियावर तुफान व्हायरल @AwardsDarwin_ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने जर या व्यक्तीचा ओठ त्या बंदुकीत अडकला तर भारी पडू शकतं अशीही कमेंट केली आहे.