सोर्स : इन्स्टाग्राम
मुंबई 14 सप्टेंबर : सोशल मीडिया वापरत असताना आपल्या समोर कधी काय येईल याचा काही नेम नाही. येथील व्हिडीओ कधी आपलं मनोरंजन करतात तर कधी थरकाप उडवतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ देखील असाच आहे. जो पाहून सर्वांना मोठा धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अचानक मर्सिडिज कारला पेट्रोल टाकून आग लावते. ज्यामुळे लोकांनी आधी या घटनेसाठी संताप व्यक्त केला. परंतू त्यांना जेव्हा या घटनेची सत्यता कळाली तेव्हा अनेकांनी या व्यक्तीनं जे केलं ते बरोबरंच केलं असं म्हटलं आहे. आता तुमच्या मनात देखील प्रश्न उपस्थीत झाला असेल की, हे नक्की असं का घडलं? तर ही व्यक्ती एक मेस्त्री किंवा कडियाचं काम करणारी व्यक्ती आहे. जी पेट्रोल किंवा किरोसीन घेऊन येते आणि समोर उभ्या असलेल्या मर्सिडिजवरती टाकते. नंतर या कारला आग लावते. हे वाचा : Car मालकासोबत घडला धक्कादायक प्रकार, दुरुस्त करताना गाडी सुरु झाली आणि… VIDEO व्हायरल खरंतर या व्यक्तीने या मर्सिडिज मालकाच्या घरी लादी आणि टाईल्स बसवण्याचं काम केलं होतं. परंतू असं असून देखील त्याने या मजूराचे पैसे थकवले होते आणि अनेक महिन्यांपासून पैसे दिले नाही. अखेर या व्यक्तीने त्याची गाडी जाळण्याचा विचार केला आणि तसं केलं देखील. ही घटना उत्तरप्रदेशमधील असल्याचं सांगितलं आहे. हे वाचा : थरारक! वळण घेताच ट्रेलर ट्रक कोसळला, समोरुन येणाऱ्या कारला असं चीरडलं की ती खेळण्यातलीच, VIDEO VIRAL हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर होताच लोकांनी त्याबद्दल चर्चा करायला आणि त्याला शेअर करायला सुरुवात केली आहे. लोकांना जेव्हा या व्यक्तीचं असं वागण्या मागचं खरं कारण समजलं तेव्हा बरेच लोक त्याला सपोर्ट करु लागले.
अनेक लोक यावर कमेंट देखील करु लागले आहेत. या व्यक्तीनं जे केलं ते कायद्यानं चुकीचं आहे. परंतू त्यानं जे केलं ते चांगलंच केलं असं देखील नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.