नवी दिल्ली 17 मे : सोशल मीडियावर सतत काही ना काही नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. तुम्ही सोशल मीडियावर सक्रीय असाल तर इथे दररोज तुम्हाला शेकडो नवे व्हिडिओ पाहायला मिळत असतील. यातील काही व्हिडिओ हैराण करणारे असतात, तर काही व्हिडिओ अतिशय मजेशीर आणि खळखळून हसवणारे असतात. विशेषतः प्राण्यांच्या व्हिडिओला सोशल मीडियावर भरपूर पसंती मिळते. अवाढव्य अजगर मानेभोवती गुंडाळून देत होता पोझ; VIDEO चा शेवट पाहून अंगावर काटा येईल प्राण्यांचे शिकारीचे किंवा माणूस आणि प्राण्यांच्या मैत्रीचे तसंच मस्तीचे अनेक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या असाच एका मेंढीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही हैराणही व्हाल आणि तुम्हाला हसूही येईल. यात दिसणाऱ्या मेंढीने या व्यक्तीसोबत असं काही केलं ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल (Sheep Hit a Man).
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Funny Video Viral) दिसतं की एक व्यक्ती तलावाच्या काठावर उभा राहून मासे पकडत आहे. हा व्यक्ती आपल्या कामात इतका मग्न आहे की त्याचं लक्ष फक्त पाण्याकडेच आहे. तर त्याच्या मागे एक मेंढी उभा असल्याचं दिसतं. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की मेंढी काही वेळ या व्यक्तीच्या मागेच उभा राहाते आणि नंतर काही पाऊलं मागे जाऊ लागते. अविश्वसनीय! शिकार समोर असून खतरनाक बिबट्याने केला नाही हल्ला; VIDEO पाहून कारण सांगू शकाल का? मेंढी नेमकी मागे का जात असेल, असा प्रश्न व्हिडिओ पाहताना पडतो. मात्र, काही पाऊलं मागे गेल्यावर अचानक ही मेंढी अगदी वेगात धावत येते आणि मासे पकडणाऱ्या व्यक्तीला मागून धडक देते. यानंतर हा व्यक्ती थेट पाण्यात कोसळतो. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत 17 लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर 63 हजारहून अधिकांनी व्हिडिओ लाईक केला आहे.