JOIN US
मराठी बातम्या / Viral / धक्कादायक! ..अन् रागात गर्लफ्रेंडनं फेकून मारला मोबाईल; तरुणाचा मृत्यू

धक्कादायक! ..अन् रागात गर्लफ्रेंडनं फेकून मारला मोबाईल; तरुणाचा मृत्यू

22 वर्षीय रोक्साना एडेलिन लोपेज हिनं रागात आपल्या 23 वर्षीय बॉयफ्रेंड लुइस ग्वांटे याला फोन फेकून मारला, यातच तिचा जीव गेला (Woman Killed Boyfriend).

जाहिरात

Representative Image

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 24 सप्टेंबर : अनेकदा रागात माणूस असं काही करतो की आयुष्यभर त्याला याचा पश्चाताप होत राहतो. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की रागात कोणीतरी कोणालातरी मारहाण केली किंवा भांडणात समोरच्याला गंभीर दुखापत झाली. मात्र, एका मुलीनं रागात जे काही केलं, त्यामुळे आता तिला तुरुंगात जावं लागू शकतं. 22 वर्षीय रोक्साना एडेलिन लोपेज हिनं रागात आपल्या 23 वर्षीय बॉयफ्रेंड लुइस ग्वांटे याला फोन फेकून मारलं, यातच तिचा जीव गेला (Woman Killed Boyfriend). कॅन्सरग्रस्त वडिलांसाठी मुलानं केलं हे भलं काम; VIDEO पाहून पाणावतील डोळे द सननं दिलेल्या वृत्तानुसार, अर्जेंटिनाच्या (Argentinian) के ला नेसियन (La Nacion) येथे राहणारी रोक्साना हिच्याविरोधात सध्या तपास सुरू आहे. याच वर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तिचा बॉयफ्रेंड लुइस तिला मारहाण करत होता. यावेळी स्वतःच्या रक्षणासाठी तिनं बॉयफ्रेंडला फोन फेकून मारला, हा फोन त्याच्या डोक्याला जाऊन लागला. फोननं मार लागल्यानंतर लुइसला डोकेदुखी आणि अस्वस्थपणा जाणवू लागला. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली असता समजलं, की त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. महिलेचे केस कापताना केलेली चूक सलूनला भोवली; द्यावी लागली 2 कोटीची नुकसान भरपाई डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशनही केलं मात्र त्याला वाचवू शकले नाहीत. यानंतर लुइसची आई पोलिसांकडे गेली आणि संशयितांविरोधात कारवाईची मागणी केली. पीडिताच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं, की मोबाईल फोनमुळे डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं यातच लुइसचा मृत्यू झाला. जेसिकानं कोर्टाला सांगितलं, की मागील 9 वर्षांपासून तिचा पार्टनर तिच्यावर अत्याचार करत होता. याच कारणामुळे तिनं हे पाऊल उचललं. जेसिकानं म्हटलं, की माझ्याकडे काहीच पर्याय उरला नव्हता. कदाचित याप्रकरणी तरुणीला कोर्टाकडून मुक्त करण्यात येऊ शकतं कारण तिनं हत्या नव्हे तर स्वतःच्या बचावात हे पाऊल उचललं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या