प्रतिकात्मक फोटो
नवी दिल्ली 06 जून : एका तरुणाचं आपल्या गर्लफ्रेंडसोबत भांडण झालं (Dispute with Girlfriend). मात्र या भांडणानंतर त्यानं उचललेलं पाऊल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या तरुणाने भांडणानंतर तब्बल 40 कोटींचं नुकसान केलं. या गुन्ह्यात त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत तरुणानेच पोलिसांना फोन करून माहिती दिली होती. हे प्रकरण अमेरिकेतील Dallas शहरातील आहे. येथे, 21 वर्षीय तरुण ब्रायन हर्नांडेझने आपल्या गर्लफ्रेंडशी भांडण केल्यानंतर संग्रहालयाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. ब्रायनने म्यूझियममध्ये ठेवलेली 5 मिलियन डॉलर (सुमारे 40 कोटी रुपये) किंमतीची प्राचीन ग्रीक कलाकृती तोडली. क्षणात भंगलं स्वप्न; गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज करत असतानाच तिसऱ्याची एन्ट्री, VIDEO पाहून नेटकरीही संतापले आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ब्रायन हर्नांडेझने स्वत: नंतर पोलिसांना फोन केला आणि घटनेची माहिती दिली. त्याने सांगितलं की त्याने रागात मौल्यवान प्राचीन कलाकृती नष्ट केली आहे, कारण त्याचं आपल्या गर्लफ्रेंडसोबत भांडण झालं होतं. ‘डेली मेल’च्या रिपोर्टनुसार, ब्रायनने म्युझियममध्ये घुसून सुमारे 2,500 वर्षे जुन्या जवळपास तीन प्राचीन ग्रीक कलाकृती नष्ट केल्या. या कलाकृतींची किंमत अंदाजे 40 कोटी रुपये आहे. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास ब्रायनने खुर्चीच्या सहाय्याने संग्रहालयाचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. उडत्या विमानात प्रवाशांची जबर हाणामारी; इतकं धक्क्दायक कृत्य केलं, की करावं लागलं Emergency Landing पोलिसांचे म्हणणं आहे की सीसीटीव्ही फुटेजमध्ये ब्रायन स्टूलच्या मदतीने प्राचीन कलाकृती तोडताना दिसत आहे. ब्रायनने ज्या वस्तू नष्ट केल्या त्या दुर्मिळ पुरातन वस्तू होत्या आणि त्या अत्यंत मौल्यवान होत्या. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ब्रायनला अटक करण्यात आली असून त्याने अधिकाऱ्यांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांनी सांगितलं की जेव्हा संग्रहालयात उपस्थित असलेल्या रक्षकांनी ब्रायनला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि विचारलं की तो इथे काय करत आहे, तेव्हा त्याने सांगितलं की तो त्याच्या गर्लफ्रेंडवर रागवला आहे, त्यामुळे मालमत्ता नष्ट करण्यासाठी जात आहे.