प्रतीकात्मक फोटो - Canva
नवी दिल्ली, 18 जून : सोशल मीडियावर तुम्ही आतापर्यंत बरेच व्हिडिओ, फोटो पाहिले असतील. पण सध्या एक अशी पोस्ट व्हायरल होते आहे जी पाहून तुम्ही पोट धरून हसाल. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही पोस्ट आहे चक्क एका डेटिंग अॅप च्या बायोची. सोशल मीडियाच्या जमान्यात डेटिंगही ऑनलाइन होते. यासाठी डेटिंग अॅप, डेटिंग वेबसाइट आहेत. जिथं लोक रजिस्टर करतात. समोरच्या व्यक्तीला आपल्याबाबत थोडी माहिती मिळावी, यासाठी आपला फोटो आणि आपली माहिती देतात. खरंतर याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. जे पाहूनच समोरची व्यक्ती डेट करते. त्यामुळे ही माहिती अगदी आकर्षक असावी असा प्रयत्न असतो. याच प्रयत्नात एका तरुणाने डेटिंग अॅपवरील बायो अशा पद्धतीने लिहिला आहे की तो तुफान व्हायरल होतो आहे. ऐकावं ते नवल! ‘या’ तरुणीला भेटण्यासाठी द्यावी लागते ‘परीक्षा’; कारणही आहे अजब @gharkakabutar या ट्विटर युजरने हा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. देवांश नावाच्या मुलाचा डेटिंग अॅपवरील हा बायो आहे. जो खरंच मजेदार आहे. ज्यात त्याने लिहिलं आहे की, गोंडस क्षण पुन्हा तयार करायचे आहेत, लागतात? आ जाओ करा दूंगा. लायब्ररी डेटवर जायचं आहे? आ जाओ करा दूंगा. गाणी ऐकताना सूर्यास्त पाहायचा आहे, आ जाओ करा दूंगा. लोक या बायोसह क्रिएटिव्ह होत आहेत, असं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 24 वर्षीय ही तरुणी फक्त वयस्कर लोकांना करते डेट; तिच्या वयाच्या मुलांमध्ये नाही इंटरेस्ट, काय आहे कारण? हा बायो पाहिल्यानंतर त्यावर बर्याच कमेंट येत आहेत. एका यूजरने तर हे पाहून त्याच्या मित्रानेही त्याचा बायो असा बनवल्याचं सांगितलं. ‘आता इतकंच बघायचं बाकी होतं’, ‘आजच्या तरुणांनी राष्ट्र उभारणीचा विचार केला पाहिजे आणि तो हा सुंदर क्षण पुन्हा तयार करत आहे.’ अशा कमेंटही या पोस्टवर येत आहेत.
यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.