यूकेमध्ये राहणारी ही तरुणी जिचं नाव लॉरेन केम्पटन आहे. Hinge डेटिंग अॅपवर तिचं प्रोफाइल आहे. त्यात दिल्यानुसार या महिलेला भेटण्यास इच्छुक असणाऱ्या पुरुषांना एक परीक्षा द्यावी लागेल.
पोर्ट्समाऊथमध्ये राहणारी लॉरेन एका मुलीची आई आहे. पार्टनरसोबत नातं तुटल्यानंतर 10 वर्षांपासून ती सिंगल आहे. तिचं वय 36 आहे.लॉरेनने डेटिंग अॅपच्या प्रोफाईलवर एक अट ठेवली आणि त्याला चांगला रिस्पॉन्सही मिळाला.
महिलेने आपल्या प्रोफाईलमध्ये नमूद केल्यानुसार तिच्यासोबत डेटिंग करण्यास उत्सुक असणाऱ्या पुरुषांनी डेटआधी एक अर्ज करावा. 500 शब्दांचा निबंध लिहावा. तो निबंध पाहून लॉरेन त्या पुरुषाला भेटायचं की नाही ते ठरवणार. लॉरेनच्या मते, यामुळे तिचा वेळ वाया जाणार नाही.
तिला अनेकांनी रिस्पॉन्स दिला. काहींनी तर फक्त निबंधच दिला नाही तर पॉवर पॉईंट प्रेंझेंटनेशनही दिलं. अशाच पीपीटी देणाऱ्या व्यक्तीसोबतही काही लॉरेन्सचं जुळलं नाही.
लॉरेन म्हणाली, बहुतेक डेटिंग बोरिंग होत्या. पण अनेकांचे मेसेज आले. ही अट तिने मजेत ठेवली पण त्यावर गांभीर्याने रिप्लाय आले. अद्याप लॉरेनला कुणी पार्टनर मिळालेला नाही. ती आता डेटिंग अॅप्सपासून दूर राहते. पुरुषांवर विश्वास करण्याचा प्रयत्न ती करते आहे. (फोटो-Facebook/Lauren Kempton)