बँकॉक, 14 मार्च : जगभरात असे बरेच जीव आहेत, ज्यांना आपण कधीच पाहिलं नाही. यापैकी काही जीव इतके विचित्र असतात की त्यांना पाहून असे जीवही असू शकतात का, असाच प्रश्न पडतो. असे प्राणी पाहून आपला आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही. सध्या अशाच एका विचित्र जीवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या जीवाला पाहून सर्वजण हैराण झाले आहेत (Snake look like grass). थायलंडमध्ये हा विचित्र जीव सापडला आहे. हा जीव तसा दिसायला सापासारखा आहे. पण त्याच्या संपूर्ण शरीरावर गवतासारखे हिरवे केस आहेत (bizarre furry green snake). थायलंडच्या सखोन नाखोनमध्ये एका व्यक्तीला हा जीव दिसला. तू असं नाव असलेली 49 वर्षांची ही व्यक्ती जिला गवत आणि चिखल असलेल्या भागात हा जीव दिसला. या भागात सामान्यपणे साप दिसतही नाही. तू यांच्या कुटुंबाने सांगितलं असा सापासारखा जीव त्यांनी याआधी कधीच पाहिला नाही. त्यामुळे याच्याबाबत माहिती मिळेपर्यंत त्यांनी याला आपल्या घरातच ठेवलं. हे वाचा - खुर्चीवर बसून काम करत होता व्यक्ती; इतक्यात सरपटत आला विषारी साप अन्.., VIDEO न्यूजफ्लेअरच्या मते, या विचित्र जीवाला शरीरावर हिरव्या रंगाचे केस असलेला साप म्हटलं जातं आहे. काही व्यक्तींना त्याला पाण्यातील साप असल्याचं म्हटलं आहे.
NSW सेंट्र्ल कोस्टवर वाइल्डलाइफ एआरसीच्या तज्ज्ञांच्या मते, सापाच्या शरीरावर दिसणारे हिरव्या रंगाच्या केसासारखा भाग हा केरोटिननेच बनलेला आहे. याला पफ फेस वॉटर स्नेक किंवा नकाबपोश वॉटर स्नेकही म्हटलं जातं. हा जीव उष्ण भागात जास्त दिसतो. सामान्यपणे उत्तर सुमात्रापासून सालंगा आइलँड, इंडोनेशिया आणि बोर्नियोमध्ये सापडतात. मलेशियन आयलँड आणि दक्षिण थाईलँडमध्येही दिसू शकतात. हे पाणी आणि दगडात लपून सहजपणे शिकार करतात. हे वाचा - आकाशातून कोसळताना दिसला दगड; 18 महिन्यांनी सत्य समजताच बसला आश्चर्याचा धक्का तुम्ही असा जीव कधी पाहिला आहे का आणि हो तर याला काय म्हणतात, याच्याबाबत तुम्हाला काही माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.