JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video : सापाला दोरीसारखा ओढत होता चिमुकला, पाहून घरातील लोकही पळू लागले

Viral Video : सापाला दोरीसारखा ओढत होता चिमुकला, पाहून घरातील लोकही पळू लागले

सापाची अनेक लोक पूजा करतात. मात्र तो दिसला तरी बऱ्याचजणांना घाम फुटतो. साप हा धोकादायक आणि भयानक प्राण्यांपैकी एक आहे. तो कधी हल्ला करेल काही सांगता येत नाही आणि त्याच्या हल्ल्यात वाचणंही कठिण.

जाहिरात

सापाला दोरीसारखा ओढत होता चिमुकला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 जुलै : सापाची अनेक लोक पूजा करतात. मात्र तो दिसला तरी बऱ्याचजणांना घाम फुटतो. साप हा धोकादायक आणि भयानक प्राण्यांपैकी एक आहे. तो कधी हल्ला करेल काही सांगता येत नाही आणि त्याच्या हल्ल्यात वाचणंही कठिण. सापाचे अनेक निरनिराळे व्हिडीओ समोर येत असतात. अशातच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय. जो पाहून तुम्ही चिमुकल्याच्या धाडसाचं कौतुक कराल. हा थक्क करणारा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. एक मुलगा हातात साप घेऊन घरात येतो. तो दोरीसारखा त्या सापाला ओढत आणतो. हा थक्क करणारा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. चिमुकल्याचं धाजस थक्क करणारं मात्र त्याच्या या कारनाम्यामुळे बाकीच्यांनी धडकी भरली.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला सापाला दोरीसारखं ओढत आहे. त्यानं सापाला ओढत नेत घरात नेलं. घरात सर्व निवांत बसलेले आहेत. मात्र मुलाला साप घेऊन येताना पाहून त्यांना धडकी भरली. ते घाबरुन उठले आणि सैरभैर होऊ लागले. नंतर एक व्यक्ती येऊन मुलाला सापासोबत घेऊन जातो. मुलाला साप चावला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.

संबंधित बातम्या

@f_l_addiction.officia नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही वेळातच व्हिडीओ इंटनेटवर धुमाकूळ घालताना पहायला मिळाला. अनेक लोक व्हिडीओवर कमेंट करत संताप व्यक्त करत आहेत. लहान मुलासोबत निष्काळजीपणामुळे लोक भडकल्याचं कमेंटवरुन दिसतंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या