नवी दिल्ली 24 एप्रिल : जंगलाचा राजा असलेला सिंह समोर दिसताच भल्याभल्यांची अवस्था बिकट होते. सिंह दिसताच जंगलातील इतर प्राणी एकतर तिथून पळ काढतात किंवा कुठेतरी लपून बसतात. माणूसही सिंहापासून सुरक्षित अंतर ठेवण्यातच आपलं भलं समजतो. मात्र कल्पना करा की तुम्ही जंगल सफारीला गेला आहात आणि एक भयानक सिंह अचानक तुमच्या गाडीत शिरला (Lion in Tourist Vehicle). हे पाहून तुमची काय अवस्था होईल? सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Video Viral on Social Media) होत आहे. लग्नाच्या स्टेजवर नवरीने नवऱ्याला केलं सुन्न; Wedding Video होतोय व्हायरल व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की, काही लोक पर्यटकांच्या गाडीतून जंगल सफारीला गेलेले आहेत. दरम्यान अचानक एक सिंह त्यांच्या समोर येतो. सिंहाला पाहून भीतीने लोकांची अवस्था खराब होते. खुलं पर्यटक वाहन पाहून सिंह अचानक या पर्यटकांनी भरलेल्या गाडीमध्ये घुसतो. त्यानंतर जे घडतं ते खूपच थक्क करणारं आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जंगलाचा राजा गाडीत घुसून कोणाचीही शिकार करत नाही. तो लोकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतो. गाडीत बसलेले लोक सिंहाला पाहून थोडे घाबरतात. मात्र, नंतर ते सिंहासोबत सेल्फी घेतानाही दिसत आहेत. हा सिंह बराच मोठा असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. सिंहाचा भयानक चेहरा पाहून कोणालाही घाम फुटेल. मात्र, इथे वेगळंच घडतं. VIDEO: हातात भलामोठा साप घेऊन खेळत होता तरुण; इतक्यात सापाने घेतला चावा, पुढे जे घडलं ते हैराण करणारं आश्चर्यकारक बाब म्हणजे एवढा मोठा सिंह पाहून पर्यटक घाबरत नाहीत. सिंहाला जवळ बघून लोक आनंदी होतात. काही लोक सिंहाच्या पाठीवरुन हात फिरवताना दिसतात. तर सिंह मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला चिकटून बसलेला दिसतो आणि त्याला लळा लावू लागतो. हे पाहून असं वाटतं, जणू सिंहाला त्याचा जिवलग मित्र सापडला आहे. फिगन नावाच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये ‘अनपेक्षित कृत्य’ असं लिहिलं आहे.